Home क्राईम Anil Deshmukh: अनिल देशमुखांच्या घरी सीबीआयचा छापा, सीबीआयकडून गुन्हा दाखल

Anil Deshmukh: अनिल देशमुखांच्या घरी सीबीआयचा छापा, सीबीआयकडून गुन्हा दाखल

CBI files case against Home Minister Anil Deshmukh

Anil Deshmukh:  माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या नागपूरच्या घरी सीबीआयने अचानाक छापा टाकला आहे. राज्यात १० पेक्षा अधिक ठिकाणी सीबीआयने छापे टाकले. अनिल देशमुख यांच्याविरोधात एफआयआर दाखल केला आहे.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी देशमुख यांच्या विरोधात १०० कोटी जमा करावयाचे असे गंभीर आरोप केले होते. सीबीआयकडून देशमुख यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  अनिल देशमुखांसह इतर काही जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. तसेच प्रकरणाच्या तपासाच्या अनुषंगाने काही ठिकाणी सीबीआयकडून झाडाझडतीही सुरू करण्यात आली आहे.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या आरोपांमुळे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरुद्ध सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे. सिंह यांनी केलेल्या आरोपांप्रकरणी देशमुख यांच्यासह इतरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, विविध ठिकाणांची झाडाझडती घेण्यास सीबीआयने सुरुवात केली आहे.

Web Title: CBI files case against Home Minister Anil Deshmukh

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here