Home महाराष्ट्र बेरोजगार तरुणांना केंद्र सरकार महिन्याला देणार ६,००० रुपये?

बेरोजगार तरुणांना केंद्र सरकार महिन्याला देणार ६,००० रुपये?

Breaking News | fact Check: निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक संदेश सध्या सोशल मीडियावर व्हायरल.

Central government will give Rs 6,000 per month to unemployed youth

पंतप्रधान बेरोजगार भत्ता योजनेअंतर्गत केंद्र सरकार प्रत्येक महिन्याला १० वी पास तरुणांना प्रत्येकी ६ हजार रुपये देणार असल्याचा दावा करणारा एक संदेश सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

व्हायरल होत असलेल्या संदेशानुसार बेरोजगार तरुणांना सरकार प्रत्येक महिन्याला ६ हजार रुपये देणार आहे. पंतप्रधान बेरोजगार भत्ता योजनेअंतर्गत नोंदणी सुरू करण्यात आली असून, या योजनेअंतर्गत सरकार तरुणांना भत्ता देणार आहे. त्यामुळे आपल्या मोबाइलवर खालील लिंकवर तात्काळ क्लिक करून अर्ज करण्याचे आवाहन संदेशात केले आहे. मात्र हा संदेश बनावट आहे. अशी कोणतीही योजना भारत सरकार चालवत नाही. त्यामुळे कोणत्याही संशयास्पद लिंकवर कधीही क्लिक करू नका, अशा संदेशामार्फत तुमच्या खात्यातील माहिती चोरण्याचा प्रयत्न करण्यात येतो. त्यामुळे आर्थिक फटकाही बसतो. आर्थिक नुकसान टाळण्यासाठी आपली वैयक्तिक माहिती कोणालाही न देण्याचे आवाहन पीआयबी फॅक्टचेकने केले आहे.

फॅक्ट चेक

प्रधानमंत्री बेरोजगार भत्ता योजना 2022 में अपना रजिष्ट्रेशन करें, हम योजना के अंत सभी युवा बेरोजगारों व 6000 ये हर महीने रजिस्ट्रेशन करने के लिए निचे दिए लिंक पर जिनक कर आपने मोबाइल नंबर से रजिस्टर करें।

आवेदन शुल्क DO Rs योग्यता 10वी यास आयु 18 से 40 वर्ष

Web Title: Central government will give Rs 6,000 per month to unemployed youth?

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here