Home भारत पुन्हा पावसाची शक्यता; थंडीत वाढ होण्याचा हवामान खात्याचा ईशारा

पुन्हा पावसाची शक्यता; थंडीत वाढ होण्याचा हवामान खात्याचा ईशारा

Cold WaveCold Wave : जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यातही थंडीची लाट अजूनही कायम आहे. उत्तर भारतात, हिमाचल प्रदेश आणि काश्मीरमध्ये होणाऱ्या हिमवृष्टीमुळे तापमानात घट झाली आहे. दरम्यान, हवामान खात्याने मध्य आणि पश्चिम भारतासाठी नवीन अलर्ट जारी केला आहे. आजपासून देशातील काही भागात थंडीच्या लाटेचा नवा टप्पा सुरू होणार आहे. केवळ तापमानात घट होणार नाही, तर २ ते ४ फेब्रुवारी दरम्यान पाऊसही पडू शकतो असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, उत्तर-पश्चिम आणि मध्य भारतात ताशी १०-२० किलोमीटर वेगाने वारे वाहतील. त्यामुळे या भागाचे तापमान २ ते ४ अंश सेल्सिअसने खाली उतरू शकते. मध्य प्रदेशातील एकाकी भागात थंडीची लाट कायम राहील. याशिवाय छत्तीसगड आणि विदर्भातही तापमानात घट नोंदवली जाईल.

दरम्यान, पुढील काही दिवस विदर्भ, उत्तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि गुजरात राज्यात काही ठिकाणी थंडीची लाट कायम राहू शकते. मुंबईसह महाराष्ट्राच्या विविध भागांत आताच पारा घसरून हूडहुडी भरू लागली आहे. मंद वाऱ्यांमुळे थंडी असह्य झाली आहे. अशावेळी हवामान विभागाने दिलेला ताजा अलर्ट महाराष्ट्राच्याही चिंतेत भर टाकणारा ठरला आहे.

Web Title : Chance of rain again; Weather forecast for cold snap

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here