छगन भुजबळ आणि मनोज जरांगेंगध्ये पुन्हा जुंपली; वैयक्तिक हल्लाबोल
Maratha reservation: राज्यात भुजबळ-जरांगे यांचे शाब्दिक युद्ध, दोघांनी एकमेकांवर वैयक्तिक हल्लाबोल केला.
Maratha reservation: मराठा आरक्षणासाठी एकीकडे मनोज जरांगे पाटील आग्रही मागणी करतायेत तर दुसरीकडे मराठ्यांना वेगळे आरक्षण द्या ओबीसीमधून नको अशी भूमिका मंत्री छगन भुजबळ मांडत आहे. त्यात मागील २ महिन्यापासून राज्यात भुजबळ-जरांगे यांचे शाब्दिक युद्ध पाहायला मिळत आहे. त्यात आता दोघांनी एकमेकांवर वैयक्तिक हल्लाबोल केला आहे. बेवड्या, पिऊन पिऊन किडन्या किडल्या अशी बोचरी टीका भुजबळांनी जरांगेंवर केली तर भुजबळ हे मुर्खाचा मुकादम आहे असा पलटवार जरांगेंनी भुजबळांवर केला. (Chhagan Bhujbal and Manoj jarange Patil)
भिवंडी येथील ओबीसी मेळाव्यात छगन भुजबळ म्हणाले की, जरांगे आमची लायकी काढतात. काहीही बोलतो, मला येवल्याचा पेडपाट म्हटलं. एक म्हण आहे ‘आधीच मर्कट तशातच मद्य प्याला’ आधीच माकड त्यात बेवडा प्यायला, काहीही बोलतो. अरे आमची लायकी तू काय काढतोस, काय तुझी हिंमत, काय बघणार आहे मला? तू तुझी तब्येत सांभाळ, बेवडा पिऊन पिऊन तुझ्या किडन्या किडल्या त्या सांभाळ, मला मारण्याच्या धमक्या, उघडपणे दादागिरी करतोय. हे अजिबात सहन केले जाणार नाही असं त्यांनी म्हटलं.
त्यावर हा आधीच जातीवादी आणि तो मुर्खाचा मुकादमच आहे. महामुर्ख माणूस असल्याने त्याला येडपाट म्हणतो. माझ्या शरीराला जन्मल्यापासून दारूचा डाग नाही. हे शरीर जनतेसाठी लढून असं झालंय. तुझ्यासारखं लोकांचे रक्त पिऊन शरीर वाढले नाही. माकड काय करू शकतो हे रावणाला विचार, तुझीही लंका जळेल, नीट राहा असा पलटवार मनोज जरांगे पाटील यांनी भुजबळांवर केला आहे.
जन्मापासून आतापर्यंत माझ्या शरीराला दारुचा स्पर्श जरी झाला असेल तर मी जिवंत समाधी घेतो अन्यथा भुजबळांनी जिवंत समाधी घ्यावी, असं आव्हान जरांगे पाटील यांनी दिलं आहे
छगन भुजबळांनी केलेल्या आरोपांवर प्रतिक्रिया देताना मनोज जरांगे म्हणाले, “यामुळेच मी त्याला (छगन भुजबळ) येडपट म्हणतो. खास येडपट म्हणता. तो येवल्यात बसून सासुच्या घरचं खातो, म्हणूनच मी त्याला येडपट म्हणतो. मी त्याला जाहीर आव्हान करतो की, माझी नार्को टेस्ट करा. जन्मापासून आतापर्यंत माझ्या अंगाला दारूचा स्पर्श जरी झाला असेल तर मी जिवंत समाधी घेतो. नाहीतर त्यांनी तरी जिवंत समाधी घ्यावी. हे मी अत्यंत जबाबदारीने बोलत आहे. त्यामुळे तू काहीही बोलू नको, मापात राहा.”
छगन भुजबळांना उद्देशून मनोज जरांगे पुढे म्हणाले, “तो प्रचंड जातीवादी आहे. तो मुर्खांचा मुकादम आहे. तो महामूर्ख माणूस आहे. त्यामुळेच मी त्याला येडपट म्हणतो. माझ्या शरीराला जन्मापासून दारुचा डागही नाही. हे शरीर जनतेसाठी लढून असं झालं आहे. तुझ्यासारखं लोकांचं रक्त पिऊन शरीर वाढलं नाही आणि माकड काय करू शकतं? ते जरा रावणाला विचार. तुझी लंकाही जळेल, जरा नीट राहा.”
Web Title: Maratha Reservation Chhagan Bhujbal and Manoj Jarange were reunited