घरचा आहेर, मुख्यमंत्र्यांच्या शब्दाला पाच पैशाचीही किंमत नाही- गणेश नाईक
Breaking News | Ganesh Naik: मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेऊन आणि आदेश देऊनही त्याची अंमलबजावणी होत नाही.
मुंबई : सिडको आणि शासनात बिल्डर लोकांचे दलाल आहेत. आज या दलालांमुळेच जनतेच्या स्वप्नांचा चक्काचूर झालेला आहे. मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेऊन आणि आदेश देऊनही त्याची अंमलबजावणी होत नाही. त्यांच्या शब्दाला पाच पैशाचीही किंमत राहिलेली नाही, असा घरचा आहेर भाजपाचे आमदार आणि माजी मंत्री गणेश नाईक यांनी दिला. हे मी गांभीर्यान बोलत आहे. मला कोणाचे भय नाही, अशा शब्दांत त्यांनी आपली नाराजी सभागृहात व्यक्त केली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीतील निर्णयानुसार नवी मुंबई महापालिकेला सिडको प्राधिकरण आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून (एमआयडीसी) भूखंड मिळावेत, अशी मागणी नाईक यांनी लक्षवेधी सूचनेच्या माध्यमातून बुधवारी सभागृहात केली. यावेळी त्यांनी महायुती सरकारला घरचा आहेर दिला. मुख्यमंत्री शिंदे यांनी १ जून २०२३ रोजी सह्याद्री अतिथीगृहावर बैठक घेतली, यात त्यांनी विविध निर्णय घेत त्याची अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले. सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक, एमआयडीसीचे अधिकारी व नवी मुंबई महापालिका आयुक्तांनी एकत्रितपणे प्रश्न सोडवावा असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले होते. पण तेरा महिने झाले तरी पुढे काहीच झाले नाही. प्रशासनाने बैठकीत झालेल्या निर्णयांचे पुरते बारा वाजवायचे ठरवले आहे, अशी खदखद नाईक यांनी व्यक्त केली.
Web Title: Chief Minister’s word is not worth even five paise
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study