Home अहमदनगर वडील व सावत्र आईच्या छळास कंटाळून मुलाची आत्महत्या

वडील व सावत्र आईच्या छळास कंटाळून मुलाची आत्महत्या

Child commits suicide after being harassed by father and stepmother

Ahmednagar | Rahuri | राहुरी: वडील व सावत्र आईकडून सातत्याने होणाऱ्या छळास कंटाळून कुणाल चौधरी वय १७ रा. कुक्कडवेढे या मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या घटनेबाबत कुणालच्या आजोबाने दिलेल्या फिर्यादीवरून वडील व सावत्र आई विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कुक्कडवेढे येथील कुणाल प्रकाश चौधरी याने बारावीची परीक्षा दिली होती. ७ जूनला परीक्षेचा निकाल लागणार होता. मात्र निकालाच्या एक दिवस अगोदर कुणालने आत्महत्या केली. या घटनेबाबत राहुरी पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती.

दरम्यान गुरुवारी कुणाल चौधरीचे आजोबा जालिंदर भानुदास ढोकणे रा. उंबरे यांनी राहुरी ठाण्यात कुणालचे वडील व सावत्र आई यांच्या विरोधात फिर्याद दाखल केली. फिर्यादीत म्हंटले आहे की, मयत कुणालला त्याचे वडील प्रकास चौधरी व सावत्र आई सुवर्णा उर्फ ज्योती चौधरी हे त्रास देत होते. मयत कुणाल चौदाह्री याची सख्खी आई उषा चौधरी यांच्या डोक्याचे ऑपरेशन झाल्याने आरोपी प्रकाश चौधरी याने दुसरे लग्न केले. पहिली पत्नीला वेळोवेळी शारीरिक व मानसिक त्रास दिला. या कारणावरून प्रकाश व ज्योती यांच्या नेहमीच्या त्रासाला कंटाळून कुणालने आत्महत्या केल्याचे फिर्यादीत म्हंटले आहे. याप्रकरणी  प्रकाश चौधरी व ज्योती चौधरी यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. घटनेनंतर आरोपी पसार झाले आहेत.

Web Title: Child commits suicide after being harassed by father and stepmother

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here