अहमदनगर ब्रेकिंग: एसटीच्या चाकाखाली आल्याने बालकाचा मृत्यू
Ahmednagar News: एसटी बसच्या चाकाखाली सापडून एका 9 वर्षीय बालकाचा दुर्दैवी मृत्यू (dies) झाल्याची घटना.
शेवगाव: अहमदनगरमधील शेवगाव तालुक्यातील मळेगाव येथे एसटी बसच्या चाकाखाली सापडून एका 9 वर्षीय बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मळेगाव येथील शेवगाव-नगर रस्त्याच्या बाजूला राहणाऱ्या वनवे कुटुंबातील श्लोक गणेश वनवे हा ९ वर्षीय बालक आपल्या घराकडून मळेगाव गावाकडे सायकलवर जात असताना हा अपघात झाला. या अपघाताने मळेगाव गावावर शोककळा पसरली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, श्लोक गणेश वनवे हा नऊ वर्षीय बालक आपल्या घराकडून मळेगाव गावाकडे सायकलवर जात होता. श्लोक याच्यासमोरून रिक्षा जात होती. या रिक्षाला ओव्हरटेक करून पुढे जाण्याचा प्रयत्न करीत असताना अचानक समोरून राहुरीच्या दिशेने जाणारी शेवगाव-राहुरी बस आली. त्यावेळी बस चालकाला अंदाज न आल्याने श्लोकची सायकल बसच्या पुढील चाकाला धडकली आणि श्लोक आदळला गेल्याने बसच्या उजव्या बाजूच्या पाठीमागील चाकाखाली डोके सापडून जागीच ठार झाला.
श्लोक वनवे याचे वडील हे सोलापूर येथे पोलीस दलात कार्यरत आहेत. दरम्यान हलगर्जीपणे वाहन चालवून अपघात केल्याबद्दल शेवगाव आगाराचे चालक शहादेव लक्ष्मण गोरे रा.जोहरापुर ता.शेवगाव ( वय 51) यांच्या विरोधात मोटार वाहन कलम 184/177 तसेच 304/अ ,337/338 कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Web Title: Child dies after falling under the wheel of ST
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App