Home Maharashtra News कोरोनामुळे अनाथ झालेल्या मुलांसाठी ठाकरे सरकारची मोठी घोषणा

कोरोनामुळे अनाथ झालेल्या मुलांसाठी ठाकरे सरकारची मोठी घोषणा

children orphaned due to corona

मुंबई | Corona:  कोरोनामुळे अनाथ झालेल्या मुलांना महाविकास आघाडी सरकारने मदतीची मोठी घोषणा केली आहे. मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे की,  कोरोनामुळे अनाथ झालेल्या मुलांच्या नावे ५ लाखांची मुदत ठेव रक्कम बँकेत जमा केली जाणार आहे. त्या अनाथ मुलांना सदर रक्कम व्याजासह वयाच्या २१ व्या वर्षी मिळणार आहे.

कोरोनामुळे आत्तापर्यंत एकूण ५ हजार १७२ मुलांनी आपल्या आई वडिलांपैकी एकास गमावले आहे. तर १६२ मुलांनी आई वडील दोघांनाही गमावले आहे. सरकारच्या निर्णयामुळे अनाथ मुलांच्या भविष्यासाठी मोठी मदत होणार आहे. मुलांच्या उद्योग व्यवसायासाठी व शिक्षणासाठी मोठे आर्थिक पाठबळ मिळणार आहे. अनाथ मुलांना २१ व्या वर्षी व्याजासह ही रक्कम मिळणार आहे.

Web Title: children orphaned due to corona

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here