Home औरंगाबाद बापाच्या बंदुकीने चिमुकल्याचा गेला जीव

बापाच्या बंदुकीने चिमुकल्याचा गेला जीव

घरात गावठी बंदुकीतून गोळी  (Fire) लागून जखमी झालेल्या अडीच वर्षीय चिमुकल्याचा रविवारी सकाळी उपचारादरम्यान मृत्यू.

child's life was lost by the father's gun

गंगापूर | औरंगाबाद: शहरातील अहिल्यादेवीनगर येथे शुक्रवारी सायंकाळी घरात गावठी बंदुकीतून गोळी लागून जखमी झालेल्या अडीच वर्षीय चिमुकल्याचा रविवारी सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला. आर्यन राहुल राठोड असे मृत मुलाचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांच्या ताब्यात असलेला मृत मुलाचा बाप आरोपी राहुल राठोड याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अहिल्यादेवीनगर येथे बीड जिल्ह्यातील गेवराई येथील दाम्पत्य राहुल कल्याण राठोड (२९) पत्नी संगीता व अडीच वर्षांच्या मुलगा आर्यनसह भाडेकरू म्हणून राहत होते. राहुल एका बँकेत वसुलीचे काम करतो. शुक्रवारी सायंकाळी त्यांच्या घरात एक दुर्घटना घडली. गावठी बंदुकीची गोळी लागून मुलगा आर्यन गंभीर जखमी सुरू होती.

झाला. या घटनेत आर्यनच्या डोक्याच्या मधोमध गोळी लागली. त्यामुळे त्याच्यावर खासगी रुग्णालयात प्राथमिक उपचार करून, अत्यवस्थ अवस्थेत त्याला छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात नेण्यात आले. शुक्रवारी रात्री त्याच्यावर एक छोटीशी शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यानंतर, घाटीतील अतिदक्षता विभागात आर्यनची मृत्यूशी झुंज सुरु होती.

Web Title: child’s life was lost by the father’s gun

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here