Home अहमदनगर Covid Vaccination: जिल्ह्यात लसीकरणाकडे नागरिकांची पाठ, लस घेता का कोणी लस

Covid Vaccination: जिल्ह्यात लसीकरणाकडे नागरिकांची पाठ, लस घेता का कोणी लस

Citizens' back to Covid vaccination in Ahmednagar

अहमदनगर | Covid Vaccination: लसीकरण केंद्रावर रांगा आणि वशिलेबाजी अनुभवणाऱ्या जिल्ह्यात लसीकरण केंद्राकडे पाठ फिरविल्याचे दिसत आहे. जिल्हायाला मिळालेले २ लाख डोस अजून शिल्लक आहे. प्रशासनावर योग्य तापमानात सांभाळण्याची जबाबदारी प्रशासनावर आली आहे. आता पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या पुढाकारातून विशेष मोहीम हाती घेण्यात येणार आहे. लोकप्रतिनिधींवरही जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

पालकमंत्र्यांनी जिल्ह्याचा आढावा घेतला. त्यात ६७ टक्के लोकानी पहिला डोस तर २३ टक्के नागरिकांनी दोन्ही डोस घेतले आहे. ३३ टक्के लोकांनी अद्याप एकही डोस घेतला नाही.  त्यामुळे जिल्ह्यात अजून खूप मोठा पल्ला पार करायचा आहे. सध्या जिल्ह्यात २ लाख लसींचा डोस शिल्लक आहे. यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. सर्व सरपंचाना विश्वासात घेऊन त्यांना पत्र लिहून मोहीम घेतली जाणार आहे. लोकांचे मन वळविण्याचे आवाहन करण्यात येणार आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील सर्व तालुक्यांतील अपडेट बातम्या वाचण्यासाठी आजच डाऊनलोड करा आमचा अॅप: संगमनेर अकोले न्यूज 

सध्या निर्बंध शिथिल झाले आहेत. काम धंदे सुरु झाले आहे. लस घेतल्यावर काही काळ विश्रांती घेण्याची वेळ येईल या शक्यतेमुळे लोक लसीकरणास येत नसावेत असे मत जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी व्यक्त केले.  

Web Title: Citizens’ back to Covid vaccination in Ahmednagar

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here