Home अहमदनगर अहमदनगर: पोलिस ठाण्यात पोलीस कर्मचाऱ्यांमध्येच हाणामारी

अहमदनगर: पोलिस ठाण्यात पोलीस कर्मचाऱ्यांमध्येच हाणामारी

Breaking News | Ahmednagar:  खाकी वर्दीतील पोलिसांनी कायदा सुव्यवस्था धाब्यावर बसवत, पोलिस ठाण्यात आपसात केलेल्या हाणामारीची शहरात चर्चा.

Clash between police personnel in police station

शेवगाव : पाहुण्याकडून पैसे का आणले ? याचा जाब विचारत एका पोलिस कर्मचाऱ्याने दुसऱ्याला मारहाण केल्याचा प्रकार शेवगाव पोलिस ठाण्यात शुक्रवारी दुपारच्या सुमारास घडल्याचे समजते. कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी ज्यांच्या खांद्यावर आहे, त्याच खाकी वर्दीतील पोलिसांनी कायदा सुव्यवस्था धाब्यावर बसवत, पोलिस ठाण्यात आपसात केलेल्या हाणामारीची शहरात चर्चा होती.

याबाबत पोलिस उपअधीक्षक सुनील पाटील यांना विचारले असता, त्यांनी सदर घटनेची चौकशी करून कारवाई केली जाईल, असे म्हटले आहे.

गत काही महिन्यांपासून शेवगाव पोलिस ठाणे चर्चेत आले आहे. पोलिसांच्या कार्यपद्धतीवर नागरिकांमध्ये उलट-सुलट चर्चा सुरू आहेत. अशातच चापडगाव येथील नागरिकांनी शेकडो जणांची फसवणूक करून पळून गेलेल्या शेअर मार्केट एजंटला पकडून पोलिसांच्या हवाली केले होते; परंतु ज्यांनी पकडून आणले, त्यांनाच तुमच्या विरोधात किडनॅपिंग केल्याचा गुन्हा दाखल होत आहे, असे सांगण्यात आल्याने नागरिक धास्तावले होते. ते नागरिक त्या एजंटला पोलिसांच्या हवाली करुन परतले; मात्र पोलिसांनी त्या एजंटला रात्रीच सोडून दिल्याचे आढळून आले. या प्रकारामुळे चिडलेल्या शेकडो नागरिकांनी पोलिस ठाण्यासमोर रास्ता रोको केला होता.

Web Title: Clash between police personnel in police station

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here