Home अहमदनगर संगमनेरात दोन कुटुंबांमध्ये हाणामारी, आठ जणांवर गुन्हा दाखल

संगमनेरात दोन कुटुंबांमध्ये हाणामारी, आठ जणांवर गुन्हा दाखल

Sangamner Crime: घरासमोर लोखंडी प्रवेशद्वार बनवण्याच्या कारणावरून दोन कुटुंबांमध्ये हाणामारी.

Clash between two families in Sangamaner crime registered against eight persons

संगमनेर: -घरासमोर लोखंडी प्रवेशद्वार बनवण्याच्या कारणावरून दोन कुटूंबीयांमध्ये हाणामारी झाल्याची घटना मंगळवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास शहरातील पदमा नगर येथे घडली. प्रकरणी पोलिसांनी आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत माहिती अशी की, शहरातील पद्मा नगर परिसरात काही कुटुंब राहतात. यातील दोन कुटुंबामध्ये घरासमोर लोखंडी गेट बनवण्याच्या कारणावरून हाणामारी झाली. याबाबत शहर पोलीस ठाण्यात परस्परांविरुद्ध फिर्याद दाखल करण्यात आल्या आहे. रवींद्र हिरालाल उडता यांनी अगोदर फिर्याद दिली.

गेट बनवण्याच्या कारणावरून विकास अंबादास रच्चा व साई विजय आडेप यांनी लोखंडी रॉड व हॉकी स्टीकच्या साहाय्याने राधाबाई उडता, ऋषिकेश संतोष सोमा व आपणास मारहाण करुन जबर दुखापत केली असे या फिर्यादीत म्हटले आहे. या फिर्यादीवरून पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा रं.जी नं. १०५२/२०२३ भा.द.वि ३२६,३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक श्री. पवार करत आहेत. यानंतर उमा अंबादास रच्चा फिर्याद दिली. घरासमोर लोखंडी यांनी गेटचे काम चालू असताना रविंद्र हिरालाल उड़ता, नरेश हिरालाल उडता, ऋषीकेश संतोष सोमा, मयुरी नरेश उडता, अनिता रविंद्र उडता, ऋतुजा संतोष सोमा सर्व रा. पद्मानगर हे आले व येथे गेट बनवायचे नाही, असे सांगून त्यांनी मारहाण केल्याचे या फिर्यादीत म्हटले आहे. या फिर्यादीवरून पोलिसांनी सहा जणांविरुद्ध गुन्हा रं.जी नं.१०५३/ २०२३ भा.दं.वि ३२४,३२३, १४३, १४७, ५०४, ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक श्री. पवार करत आहेत.

Web Title: Clash between two families in Sangamaner crime registered against eight persons

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here