Home औरंगाबाद शेतात विहिरीतील पाणी देण्यावरून हाणामारी; तिघांचा मृत्यू

शेतात विहिरीतील पाणी देण्यावरून हाणामारी; तिघांचा मृत्यू

Dharashiv Crime: हाणामारीत पारधी समाजाच्या एकाच कुटुंबातील तिघांचा मृ्त्यू झाल्याची धक्कादायक घटना. शेताचा वाद तिघांच्या जीवावर बेतला. 

Clashes over providing water from wells in fields death of three

धाराशिव : शेतात विहिरीतील पाणी देण्यावरून झालेल्या हाणामारीत पारधी समाजाच्या एकाच कुटुंबातील तिघांचा मृ्त्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत एक महिला गंभीर जखमी झाली असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. वाशी तालुक्यातील बावी गावात शेताच्या बांधावरून काळे कुटुंबात वाद सुरू होता.

रविवारी रात्री साडे आठ वाजेच्या सुमारास काळे कुटुंबातील काका, पुतणे, नणंद यांच्यात विहिरीतील पाणी शेताला देण्यावरून वाद झाला. यावेळी काठी, कोयता व पट्ट्याने एकमेकांवर वार करण्यात आले. त्यात अप्पा काळे (वय ६५ वर्ष), सुनील काळे (वय २० वर्ष), परमेश्वर काळे (वय २२ वर्ष) या तिघांचा मृ्त्यू झाला आहे, तर वैजाबाई काळे या गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर सिव्हिल रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी येरमाळा पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतल्याची माहिती आहे. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.

Web Title: Clashes over providing water from wells in fields death of three

See also: Latest Marathi News,  Breaking News liveSangamner NewsAhmednagar News

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here