चल तुला शाळेत सोडवितो, रिक्षा चालकाकडून आठवीच्या मुलीवर अत्याचार
Breaking News | Pune Crime: शाळेत चाललेल्या आठवीच्या विद्यार्थिनीला शाळेत सोडतो, असे म्हणून रिक्षाचालकाने बळजबरीने रिक्षात बसविले. आणि शाळेत सोडविण्याच्या ऐवजी स्वतः घरी नेवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना.
लोणी काळभोर : लोणी गावातून शाळेत चाललेल्या आठवीच्या विद्यार्थिनीला शाळेत सोडतो, असे म्हणून रिक्षाचालकाने बळजबरीने रिक्षात बसविले. आणि शाळेत सोडविण्याच्या ऐवजी स्वतः घरी नेवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना लोणी काळभोर परिसरात मंगळवारी (दि.०६) दुपारी घडली आहे.
याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात रिक्षाचालकावर पॉक्सोंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. विजय वसंत जाधव (वय-२४, रा. पाषाणकरबाग, लोणी काळभोर, ता. हवेली जि. पुणे) असे गुन्हा दाखल झालेल्या संशियीत आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी १४ वर्षीय अल्पवयीन मुलीने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुलगी ही लोणी काळभोर परिसरातील एका नामवंत शाळेत इयत्ता आठवीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. ती दररोज शाळेला रिक्षा अथवा बसमधून जाते. दरम्यान, मुलगी मंगळवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास नेहमीप्रमाणे शाळेत चालली होती. पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर रिक्षाची वाट पाहत थांबली होती. तेव्हा तोंडओळखीचा रिक्षाचालक आरोपी विजय जाधव तेथे आला. व अल्पवयीन मुलीला म्हणाला चल तुला शाळेला सोडवतो, असे म्हणाला. अल्पवयीन मुलगी रिक्षात बसल्यानंतर आरोपी पिडीतेला म्हणाला, तुझ्या आईचा फोन आला होता, तुझी आई मी राहत असलेल्या घरी येणार आहे. असे खोटे सांगून मुलीला घरी घेऊन गेला. त्यानंतर तिच्यासोबत लगट करून बळजबरी करू लागला. तसेच पिडीतेच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तवणूक करू लागला. मात्र आरोपीच्या तावडीतून सुटण्यासाठी मुलगी जोरजोरात ओरडू लागली. तेव्हा आरोपी तेथून पळून गेला. याप्रकरणी पिडीता यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार आरोपी विजय जाधव याच्यावर विनयभंगासह बाललैंगिक अत्याचार कायदा कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल होताच, आरोपी विजय जाधव हा फरार झाला आहे. पोलीस आरोपीच्या मागावर आहेत. घटनास्थळी पोलीस उपनिरीक्षक उदय काळभोर यांनी भेट दिली तर पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर पवार करीत आहेत.
Web Title: Class VIII girl assaulted by rickshaw driver
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study