गोळी झाडून घेत कापड व्यापाऱ्याची आत्महत्या
Breaking News | Jalna Suicide: राहत्या घरी रिव्हॉल्व्हरमधून स्वतःवर गोळी झाडून घेत आत्महत्या.
जालना : शहरातील प्रमुख कापड व्यापाऱ्यांपैकी एक असणारे अलकेश बगडिया (वय ५४) यांनी मंगळवारी सकाळी राहत्या घरी रिव्हॉल्व्हरमधून स्वतःवर गोळी झाडून घेत आत्महत्या केली.
शहरातील करवानगर भागातील राहत्या घरी अलकेश बगडिया यांनी मंगळवारी सकाळी स्वतःवर गोळी झाडून घेतली. गंभीर जखमी झालेल्या बगडिया यांना प्रारंभी जालना शहरातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. प्रकृती अत्यवस्थ असल्याने त्यांना छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. परंतु, तेथे उपचार सुरू असताना सायंकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. घटनेनंतर डीवायएसपी अनंत कुलकर्णी, सदरबाजार पोलिस ठाण्याचे पो.नि. संदीप भारती व इतर सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. ज्या रिव्हॉल्व्हरमधून बगडिया यांनी स्वतःवर गोळी झाडून घेतली ती जप्त करण्यात आली असून, फॉरेन्सिक लॅबमध्ये तपासणीसाठी पाठविण्यात आल्याचे सांगण्यात आले.
Web Title: cloth merchant committed suicide by shooting himself
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study