Home Maharashtra News मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत भगवंत मान यांची मोठी घोषणा

मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत भगवंत मान यांची मोठी घोषणा

Cm Bhagwant Mann first cabinet meeting

Cm Bhagwant Mann: पंजाब विधानसभा निवडणुकीत एक हाती सत्ता मिळविल्यावर राज्यात आम आदमी पार्टीचे सरकार स्थापन झाले आहे. शनिवारी मुख्यमंत्री भगवंत मान यांनी मंत्रिमंडळाची पहिली बैठक घेतली. या बैठकीत १० नव्या चेहरे असणारा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे.

१६ मार्च रोजी भगवंत मान यांनी शहीद भगतसिंग यांच्या गावात मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली, मुख्यमंत्री भगवंत मान यांनी पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत मोठी घोषणा केली आहे.

त्यांनी महिन्याभरात २५ हजार सरकारी नोकऱ्या देण्याची मोठी घोषणा केली आहे. २५ हजारपदे तातडीने भरण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यामध्ये १० हजार पदे पोलीस विभागातील तर १५ हजार पदे अन्य शासकीय विभागातील असतील. राज्याचे नवे सरकार आपला पहिला अर्थसंकल्प जून महिन्यात सादर करणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

Web Title: Cm Bhagwant Mann first cabinet meeting

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here