अहमदनगर: महाविद्यालयीन मुलीला पळवून नेऊन अत्याचार
Breaking News | Ahmednagar: झेरॉक्स काढण्यासाठी अहमदनगर कॉलेजच्या बाहेर आलेल्या अल्पवयीन मुलीला एका तरुणाने जबरदस्तीने दुचाकीवर बसवून शहराच्या बाहेर नेत तिच्यावर अत्याचार केल्याची घटना समोर.
अहमदनगर: नगर जिल्ह्यात अत्याचार घटनांमध्ये वाढ होत असतानाच आणखी एक घटना समोर आली आहे. झेरॉक्स काढण्यासाठी अहमदनगर कॉलेजच्या बाहेर आलेल्या अल्पवयीन मुलीला एका तरुणाने जबरदस्तीने दुचाकीवर बसवून शहराच्या बाहेर नेत तिच्यावर अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. गुरुवारी (दि. २६) दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास नगर शहरात ही घटना घडली.
याप्रकरणी पीडितेने दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलिस ठाण्यात शनिवारी (दि.२८) चेतन संतोष सरोदे (रा. बोल्हेगाव, गांधीनगर अहमदनगर) याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पीडितेने दिलेल्या फिर्यादीवरून पीडिता शहरातील एका कॉलेजमध्ये शिक्षण घेते. ती गुरुवारी दुपारी अभ्यासासाठीचे झेरॉक्स काढण्यासाठी कॉलेजच्या बाहेर आली होती. त्यावेळी पाठीमागून आरोपी आला व त्याने पीडितेस दुचाकीवर बसण्यास सांगितले. त्यास पीडितेने विरोध केला. तुझा आणि माझा काहीही संबंध नाही, तू मला त्रास देऊ नकोस, असे पीडिता फिर्यादीला म्हणाली. नंतर आरोपीने पीडितेला शिवीगाळ करत बळजबरीने दुचाकीवर बसविले व तिला शहरापासून काही अंतरावर नेऊन तिच्यावर अत्याचार केला, असे फिर्यादीत म्हटले आहे.
आरोपीविरोधात भारतीय न्याय संहिता कलम ७८, ६४, १३७ (२), ११५ (२), ३५१ (२), ३५२ यासह बाल लैंगिक अत्याचार संरक्षण अधिनियम २०१२ चे कलम ४, ८, १२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक शीतल मुगडे करत आहेत.
Web Title: College girl abducted and abused
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study