Home क्राईम कॉलेज तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून बलात्कार

कॉलेज तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून बलात्कार

Pune Crime: कॉलेज तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून बलात्कार (Rape) करणाऱ्या, फिनेल पिण्याची धमकी देत लग्न करण्यास भाग पाडणाऱ्या, चोरून काढलेले चित्रीकरण व्हायरल करण्याची धमकी

College girl caught in a love trap and Rape case has been registered against the youth

पुणे : कॉलेज तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून बलात्कार करणाऱ्या, फिनेल पिण्याची धमकी देत लग्न करण्यास भाग पाडणाऱ्या, चोरून काढलेले चित्रीकरण व्हायरल करण्याची धमकी देणाऱ्या एकावर भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी १९ वर्षीय पीडित तरुणीने फिर्याद दिली. त्यावरून नागेश चव्हाण (२३, रा. आंबेगाव बुद्रुक) या तरुणावर बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की,  पीडित तरुणी एका महाविद्यालयात शिक्षण घेते. आरोपी नागेश याने तरुणीशी ओळख वाढवली. त्यानंतर प्रेमाचा बहाणा करून तिला पुणे- सातारा रस्त्यावर असलेल्या शीतल लॉजमध्ये नेले. तेथे तिच्याशी जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवत छुपे चित्रीकरण केले. छायाचित्र आणि व्हिडीओ व्हायरल करेन अशी धमकी देत पुन्हा अत्याचार केला.

दरम्यान, पीडित तरुणी शिकत असलेल्या महाविद्यालयाबाहेर जाऊन तिला लग्नाची मागणी केली. तिने लग्नास नकार दिल्यानंतर त्याने मी फिनेल पिऊन जीव देईल, अशी धमकी दिली. यानंतर पीडित तरुणीला जबरदस्तीने सोलापूर येथे नेऊन तिच्याशी एका मंदिरात विवाह केला. दरम्यान, तरुणी वडिलांना भेटायचा बहाणा करून पुन्हा पुण्यात घरी राहायला आली. यानंतर आरोपीने तिला ब्लॅकमेल करायला सुरुवात केली. अखेर पोलिस ठाण्यात धाव घेत नागेश विरोधात फिर्याद दिली.

Web Title: College girl caught in a love trap and Rape case has been registered against the youth

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here