महाविद्यालयीन तरुणीची प्रेमप्रकरणातून आत्महत्या
Breaking News | Pune Crime: महाविद्यालयीन तरुणीने प्रेमप्रकरणातून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना.
पुणे: बिबवेवाडी परिसरात महाविद्यालयीन तरुणीने प्रेमप्रकरणातून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या तरुणीला त्रास देऊन तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी एका तरुणाविरुद्ध बिबवेवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
उत्कर्षा संतोष लोंढे (वय २०, रा. अप्पर इंदिरानगर, बिबवेवाडी) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. तर, आदित्य चंद्रकांत ढावरे (वय २५, रा. केम, ता. करमाळा, जि. सोलापूर) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. याबाबत उत्कर्षाचे वडील संतोष (वय ४५) यांनी फिर्याद दिली आहे.
माहितीनुसार, उत्कर्षाचे आदित्यशी दोन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. आदित्यच्या कुटुंबीयांना प्रेमप्रकरणाची माहिती होती. उत्कर्षा एका महाविद्यालयात शिक्षण घेत होती. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर विवाह करू, असे तिने त्याला सांगितले होते. आदित्यने तिला नोकरी मिळाल्यानंतर विवाह करू, असे सांगितले होते. दरम्यान, आदित्यच्या आईचा मृत्यू झाला. तेव्हा वर्षभरात विवाह न केल्यास तीन वर्षे विवाह करता येणार नाही, असे आदित्यने तिला सांगितले. त्याने विवाहासाठी तगादा लावला. शिक्षण पूर्ण केल्यानंतर विवाह करू, असे तिने त्याला सांगितले. आदित्यच्या त्रासामुळे उत्कर्षाने आत्महत्या केल्याची फिर्याद तिच्या वडिलांनी दिली आहे.
Web Title: College girl commits suicide due to love affair
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study