Home संगमनेर महाविद्यालयीन मुलीने तरुणाच्या त्रासाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या

महाविद्यालयीन मुलीने तरुणाच्या त्रासाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या

Breaking News | Shirur Crime:  १७ वर्षीय अल्पवयीन मुलीने तरुणाच्या त्रासाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस. ती भेटण्यास व बोलण्यास नकार देत असल्याने प्रणव याने तू शिक्षण घेत असलेल्या शाळेत तसेच शाळेबाहेर तुझी बदनामी करेल अशी धमकी.

college girl committed suicide by hanging herself after suffering from a young man

शिरूर : शिरूर शहरात शिक्षण घेणाऱ्या १७ वर्षीय अल्पवयीन मुलीने तरुणाच्या त्रासाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून, या प्रकरणातील आरोपी अद्याप फरार असल्याचे शिरूर पोलिसांनी सांगितले आहे.

याबाबत मुलीच्या कुटुंबीयांनी शिरूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असून पोलिसांनी प्रणव अशोक उबाळे (कॉलनी, रामलिंग रोड शिरुर ता. शिरुर) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. शिरूर पोलिसांनी दिलेल्या माहीतीनुसार, शिरूर शहरात शिक्षण घेणारी अल्पवयीन मुलगी तिच्या मामाच्या गावी राहत असून, ती महाविद्यालयात जात असताना प्रणव उबाळे हा वारंवार भेटून तिच्याशी बोलण्याबाबत दबाव टाकत होता. ती भेटण्यास व बोलण्यास नकार देत असल्याने प्रणव याने तू शिक्षण घेत असलेल्या शाळेत तसेच शाळेबाहेर तुझी बदनामी करेल अशी धमकी देखील दिली. हा त्रास असह्य झाल्याने तिने गळफास घेऊन आत्महत्या केली.

 अधिक तपास शिरूर पोलीस स्टेशनच्या महिला पोलीस उपनिरीक्षक माधुरी झेंडगे करत आहेत. शाळकरी व कॉलेज शिकणाऱ्या मुली, महिला शिरूर शहरात पुर्णपणे सुरक्षित नसल्याचे दिसून येत आहे. शिरूर शहर परिसरातील कॉलेज व इतर शालेय परिसरात रोड रोमियांचा चांगलाच धुमाकुळ चालू असून शिरूर पोलिसांनी आता कडक कारवाई करणे गरजेचे आहे.

Web Title: college girl committed suicide by hanging herself after suffering from a young man

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here