Home पुणे धक्कादायक! शिक्षणासाठी आलेल्या कॉलेज तरुणीवर कॅब चालकाकडून बलात्कार

धक्कादायक! शिक्षणासाठी आलेल्या कॉलेज तरुणीवर कॅब चालकाकडून बलात्कार

Breaking News | Pune Crime: शिक्षणासाठी आलेल्या महाविद्यालयीन तरुणीला धमकावून कॅबचालकाने बलात्कार (Raped) केल्याची धक्कादायक घटना समोर.

college girl who came for education was raped by a cab driver

पुणे : शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुण्यात नेमकं चाललंय तरी काय? शहरात शिक्षणासाठी आलेल्या महाविद्यालयीन तरुणीला धमकावून कॅबचालकाने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना २ जून रोजी याप्रकरणी सलमान नावाच्या कॅबचालकाविरुद्ध कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका तरुणीने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडीत तरुणी ही मूळची परगावातील असून काही दिवसापूर्वी शिक्षणासाठी पुण्यात आली आहे. तसेच ती एका महाविद्यालयामध्ये कला शाखेत शिक्षण घेत आहे. शहराच्या मध्यभागातील एका खासगी वसतीगृहात ती राहण्यास आहे. २ जून रोजी तरुणीने एका अॅपद्वारे कॅब बुक केली. तिला निगडीला जायचे होते. मात्र, तिची मैत्रीण आजारी असल्याने तिने कॅबचालक सलमानला रुग्णालयात जाण्यासाठी विचारणा केली. आरोपीने देखील तरुणीला मदत केली.

दरम्यान, कॅबचे पैसे ऑनलाइन पद्धतीने सलमानाला दिले. त्यामुळे तरुणीचा मोबाइल नंबर सलमानकडे गेला होता. त्यानंतर सलमानने तरुणीच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधून तिला त्याच्या जाळ्यात ओढले. त्यानंतर तिला कोंढव्यातील एका खोलीत घेऊन जात बळजबरीने तिच्यावर बलात्कार केला. मासिक पाळी सुरू असताना देखील आरोपीने तरुणीवर बलात्कार केला. इतक्यावरच न थांबता त्याने मोबाइलवर चित्रीकरण करून तिला धमकावले.

आरोपीच्या धमकीला घाबरलेल्या तरुणीने खासगी वसतीगृहचालक आणि मैत्रिणीला हा सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर तिने एका सामाजिक संस्थेच्या मदतीने पोलिसांकडे तक्रार दिली. त्यावरून कॅबचालकाविरुद्ध कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक  तपास पोलीस करत आहेत.

Web Title: college girl who came for education was raped by a cab driver

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here