Home नागपूर महाविद्यालयीन तरुणी देहव्यापारात, तरुणी झटपट पैसा कमावण्याच्या नादात…..

महाविद्यालयीन तरुणी देहव्यापारात, तरुणी झटपट पैसा कमावण्याच्या नादात…..

Breaking News | Prostitution:  देहव्यापाराचे अड्डे वाढले असून अल्पवयीन मुलींसह महाविद्यालयीन तरुणी झटपट पैसा कमावण्याच्या नादात या दलदलीत अडकू लागल्या.

College girls in prostitution

नागपूर : गेल्या काही महिन्यांपासून शहरात देहव्यापाराचे अड्डे वाढले असून अल्पवयीन मुलींसह महाविद्यालयीन तरुणी झटपट पैसा कमावण्याच्या नादात या दलदलीत अडकू लागल्या आहे. गुन्हे शाखेने रविवारी दोन देहव्यापाराच्या अड्ड्यांवर घातलेल्या छाप्यातून ही बाब समोर आली आहे.

सदरमधील छावणी भागातील एका सलूनच्या आड सुरू असलेल्या देहविक्री अड्ड्यावर पोलिसांनी छापा घातला. तेथून चार तरुणींची सुटका करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी सलून चालक महिलेसह दोन ग्राहक, अशा पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला.

 साक्षी ऊर्फ मनीषा चंद्राहास तुपे (३०, रा. उर्वेला कॉलोनी, वर्धा रोड), राकेश साबुलाल बंदेवार ऊर्फ राज ठाकूर (३३, रा. उज्ज्वलनगर, सोमलवाडा), अभिषेक प्रभाकर माहुरे (३२, रा. प्लॉट नं. ८९ मनीषनगर), मोहन भगवंतराव सुरकर (४०, रा. निलडोह, हिंगणा) व राजेंद्र चिंतमणराव पांडे (५२, रा. वानाडोंगरी, हिंगणा), अशी आरोपींची नावे आहेत.

आरोपी महिला मनीषा तुपे छावणी येथील ‘द लुक लक्झरी सलून स्पा’मधून देहव्यापार चालवायची. गेल्या ६ वर्षांपासून ती या व्यवसायाशी जुळलेली आहे. अल्पवयीन मुली आणि महाविद्यालयीन विद्यार्थिनींना जाळ्यात ओढून त्यांना ब्युटी पार्लरमधून आंबटशौकीन ग्राहकांकडे पोहोचवण्याचे काम ती करीत होती. मनीषाने आतापर्यंत याच व्यवसायातून लाखोंची कमाई केली. तिने शंभरावर मुलींना शहरातील वेगवेगळ्या स्पा-सलूनमध्ये देहव्यापारासाठी पाठवल्याची माहिती समोर आली आहे.

मनीषाबाबत माहिती मिळताच गुन्हे शाखेने एक बनावट ग्राहक तेथे पाठवला. मनीषाने एका तरुणीला त्याच्यासोबत पाठवले. त्याने इशारा करताच पोलिसांनी छापा घातला. आरोपी मनीषा, राकेश व अभिषेक हे चार तरुणींना देहव्यापार करण्यास प्रवृत्त करताना आढळले. याशिवाय, मोहन व राजेंद्र हे तिथे ग्राहक म्हणून मिळून आले. पोलिसांनी आरोपींच्या तावडीतून त्या चारही तरुणींची सुटका केली आणि २८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

पोलिसांनी याप्रकरणी आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवला असून पुढील तपास सुरू आहे. सदर कारवाई पोलीस ठाण्याचे ठाणेदार मनीष ठाकरे, पोलीस निरीक्षक ओमप्रकाश सोनटक्के, नंदकिशोर देवगडे, जयंता, राधा, नीलिमा, आशीष, प्रमोद यांनी केली.

Web Title: College girls in prostitution

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here