महाविद्यालयीन विद्यार्थिनीने इमारतीवरून उडी घेत केली आत्महत्या
Breaking News | Nashik Suicide Case: महिनाभरात महाविद्यालयीन विद्यार्थिनींनी आत्महत्या करण्याची ही तिसरी घटना समोर आली आहे.
नाशिक : शहरातील इंदिरानगरात साईनाथ नगर चौफुलीजवळ २२ वर्षाच्या महाविद्यालयीन विद्यार्थिनीने इमारतीवरून उडी घेत आत्महत्या (Suicide) केली. या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
माहिती अशी की, इंदिरानगरातील साईनाथ नगर चौफुलीजवळ प्रतिभा संकुल ही निवासी इमारत आहे. या इमारतीत राहणाऱ्या अनम खाटीक (२२) हिने तिसऱ्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केली. ती एमसीटी औषधनिर्माण शास्त्र महाविद्यालयात शेवटच्या वर्षात होती.
आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही. परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केल्यामुळे काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. शहरात महिनाभरात महाविद्यालयीन विद्यार्थिनींनी आत्महत्या करण्याची ही तिसरी घटना आहे. याआधी पंचवटीतील क. का. वाघ तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या मुलींच्या वसतिगृहात अस्मिता पाटील या विद्यार्थिनीने तसेच त्यानंतर कॅनडा काॅर्नरजवळील मुलींच्या एका खासगी वसतिगृहातील विद्यार्थिनीने इमारतीवरुन उडी घेत आत्महत्या केली होती.
Web Title: college student committed suicide by jumping from a building
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study