Home संगमनेर संगमनेर: गोवंश वाहतूक करणाऱ्या वाहनाचा धक्का; बजरंग दलाचे दोघे जखमी

संगमनेर: गोवंश वाहतूक करणाऱ्या वाहनाचा धक्का; बजरंग दलाचे दोघे जखमी

Breaking News | Sangamner: गोवंश वाहतूक वाहनाला रोखणाऱ्या दोन बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना सदर वाहन चालकाने धक्का देऊन वाहन पळवून नेले.

collision with a vehicle transporting cattle Two of the Bajrang Dal injured

संगमनेर:   तालुक्यातील औरंगपूर शिवारात एका वाहनातून गोवंश जनावरांची वाहतूक होत होती. सदर वाहनाला रोखणाऱ्या दोन बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना सदर वाहन चालकाने धक्का देऊन वाहन पळवून नेले. यात दोन बजरंग दलाचे कार्यकर्ते जखमी झाले आहेत. ही घटना क्रांती दिनाच्या दिवशी घडली आहे. याप्रकरणी आश्वी पोलिसांत सदर वाहनचालकासह दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गोगलगाव येथील प्रज्वल दत्तात्रय चौधरी व त्याचा चुलतभाऊ सागर विलास चौधरी मोटारसायकलवरुन (क्र. एमएच. १७, सीएन. ०८८९) निमगावजाळी गावातून औरंगपूर रस्त्याने गोगलगाव (ता. राहाता) येथे जात होते. तर औरंगपूर शिवारात पाटाच्या कडेने वाहन (एमएच. २०, ईजी. ९४८३) गोगलगावकडे जात होते. त्यात गावरान २ गायी व ४ वासरे होती. सदर वाहन थांबविण्यासाठी चौधरी बंधूंनी त्यांची गाडी थांबवली व त्यांना हात देऊन गाडी थांबवण्यास सांगितले. मात्र त्यांनी धक्का देऊन त्यांचे वाहन सुसाट पळवून नेले. गाडी चालक समद गणी महमंद शेख (रा. आश्वी बुद्रुक) व साहिल सय्यद या दोघांनी ठार मारण्याच्या उद्देशाने अंगावर गाडी घातली. यात हे दोघे जखमी होवून दुचाकीचेही नुकसान झाले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. यावरुन आश्वी पोलिसांनी दोघांवर भारतीय न्यायसंहिता २०२३ कलम ११०, ११८ (१), ३२४ (४), ३ (५) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: collision with a vehicle transporting cattle Two of the Bajrang Dal injured

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here