Home अकोले संगमनेर: कंटेनर व स्विफ्ट कार अपघात, अकोलेतील चार मृत्यू, एक जखमी

संगमनेर: कंटेनर व स्विफ्ट कार अपघात, अकोलेतील चार मृत्यू, एक जखमी

Sangamner Accident News: संगमनेरकडे जाणारी स्विफ्ट कार ( एमएच. 17 एजे. 2696) वर पलटी होऊन झालेल्या अपघातात कारमधील पाच जण गंभीर जखमी अकोले येथील पाच जण गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

Container and Swift car accident, five injured in Akole

संगमनेर:  पुण्याकडून नाशिककडे येणाऱ्या लेनवरील मालवाहतूक करणारा आयशर कंटेनर (युपी 24 टी. 8550 त्याच दिशेने मात्र सर्व्हिस रोडवरुन संगमनेरकडे जाणारी स्विफ्ट कार ( एमएच. 17 एजे. 2696) वर पलटी होऊन झालेल्या अपघातात कारमधील पाच जण गंभीर जखमी झाले आहेत.

या अपघातात आशा सुरेश धारणकर (वय ४२), सुनील धारणकर (वय ६५), अभय सुरेश धारणकर (वय ४५ ) व ओजवी धारणकर (वय २) सर्व रा.कुंभेफळ ता. अकोले यांचा मृत्यू झाला आहे तर अस्मिता अभय मिसाळ वय ४० जखमी झाल्याची माहिती पोलीस उप निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांनी दिली आहे.

सदर कार ही अकोले तालुक्यातील असल्याचे माहिती मिळत आहे. या अपघातानंतर परिसरातील ग्रामस्थ व डोळासणे महामार्ग पोलिस उपनिरीक्षक सचिन सूर्यवंशी व त्यांच्या सहकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली असून, मोठ्या प्रयासाने दबलेल्या कारमधील जखमी प्रवाशांना बाहेर काढून पुढील उपचारासाठी संगमनेरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

Web Title: Container and Swift car accident, five injured in Akole

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here