अहमदनगर: वादग्रस्त शिक्षक अखेर निलंबित
Breaking News | Ahmednagar: जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी अखेर जिल्हा परिषद सेवेतून निलंबित केले.
जामखेड : तालुक्यातील मोहा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे वादग्रस्त शिक्षक विजय सुभाष जाधव यांना जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी अखेर जिल्हा परिषद सेवेतून निलंबित केले आहे. यामुळे शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.
याबाबतची सविस्तर माहिती अशी की, शिक्षक विजय सुभाष जाधव हे मोहा येथे कार्यरत असताना सन २०२३-२४ चे वार्षिक तपासणीच्या वेळी तपासणी कामावर असलेले विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुखांना धमकावणे, दमबाजी करणे, याबाबतचा अहवाल जिल्हा परिषदेस प्राप्त झाला होता. जाधव यांनी जिल्हा सेवा (वर्तणूक) नियम १९६७ मधील ३ चा भंगकेल्या प्रकरणी मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी त्यांच्या निलंबनाचे आदेश काढले आहेत.
निलंबन काळात जाधव यांना गटशिक्षणाधिकारी कार्यालय, पंचायत समिती, नेवासा हे मुख्यालय देण्यात आले आहे. यापूर्वीच सुभाष जाधव यांनी कर्तव्यात कसूर केल्यामुळे त्यांची विभागीय चौकशी प्रास्तावित करण्यात आली आहे. जाधव यांच्या निलंबनामुळे शिक्षण क्षेत्रात कर्तव्यात कसूर करणाऱ्या शिक्षकांचे धाबे दणाणले आहेत.
Web Title: Controversial teacher finally suspended
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study