Home Ahmednagar Live News अहमदनगर जिल्ह्यात कोरोना मृत्युचा आकडा ७ हजार पार

अहमदनगर जिल्ह्यात कोरोना मृत्युचा आकडा ७ हजार पार

Corona death toll crosses 7,000 in Ahmednagar

अहमदनगर | Ahmednagar: जिल्ह्यात आठवडाभर एकही मृत्यू नोंद झाली नाही. मात्र शनिवारी कोरोनाच्या पाच जणांचा मृत्यू झाला त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना बळींची संख्या ७ हजार ने ओलांडला आहे. आज अखेर कोरोनाने एकूण मृत्यूची संख्या ७ हजार ३ इतकी झाली आहे.

जिल्ह्यात शनिवारी २४० रुग्णांची वाढ झाली. जिल्ह्यात सध्या उपचार सुरु असलेल्या रुग्णांची संख्या १ हजार ४७० इतकी झाली आहे. शनिवारी २५३ रुग्णांना घरी सोडण्यात आले.

अहमदनगर जिल्ह्यातील सर्व तालुक्यांतील अपडेट बातम्या वाचण्यासाठी आजच डाऊनलोड करा आमचा अॅप: संगमनेर अकोले न्यूज 

जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असून गत आठवड्यात एकही मृत्यू झाला नव्हता. शनिवारी दुपारी संपलेल्या २४ तासांत ५ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. जिल्ह्यात आत्तापर्यंत एकूण ३ लाख ५३ हजार २६२ इतक्या रुग्णांची नोंद झालेली आहे. त्यामध्ये ३ लाख ४४ हजार ८८९ इतके रुग्ण बरे झालेले आहेत. सध्या १४७० रुग्ण सक्रीय आहेत.

Web Title: Corona death toll crosses 7,000 in Ahmednagar

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here