Corona Vaccination: कोविशिल्डचा एक डोस घेतलेल्यांसाठी महत्वाची बातमी जाणून घ्या
Corona Vaccination: कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यांमध्ये लॉकडाऊन सुरु आहे. तर दुसरीकडे कोरोना रोखण्यासाठी लसीकरण वाढविण्यात येत आहे. मात्र देशात लसीचा तुटवडा जाणवत आहे. त्यानंतर आता कोविशिल्डचा लसींच्या दोन डोसमधील अंतर वाढविण्यात आले आहे. दोन डोस मधील अंतर वाढविल्यास लसीचा अधिक प्रभाव वाढत असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे कोविशिल्डचा दोन डोसमध्ये १२ आठवड्यांचे अंतर ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे लसीचा एक डोस घेतलेल्यांसाठी आता ८४ दिवसांनी दुसऱ्या डोससाठी appointment मिळेल अशी माहिती केंद्रसरकारनी दिली आहे.
ज्यांनी कोविशिल्डचा लसीचा एक डोस घेतला आहे आणि दुसऱ्या डोससाठी appointment घेतली आहे. त्यावर याचा काहीही परिणाम होणार नाही. जर संबधीत व्यक्तीला बदल करून ८४ दिवसानंतर डोस घ्यायचा असेल तर तो बदल करू शकतो. हा निर्णय ऐच्छिक आहे.
कोविशिल्डचा लसींच्या दोन डोसामधील अंतर वाढविण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता त्यानुसार कोविन पोर्टलमध्ये बदल करण्यात येत आहे. ज्यांनी appointment घेतली आहे. त्या व्यक्तींची appointment रद्ध होणार नाही. ती तसीच दिसेल असे केंद्राकडून सांगण्यात आले आहे.
Web Title: corona vaccination news for those who have taken a dose of Covishield