Corona Virus: पुण्यात आढळले जेएन१’ चे इतके रुग्ण, राज्यात जेएन १ रुग्णांची संख्या १० वर
Corona Virus JN 1: सद्यस्थिती राज्यात एकूण १० रुग्ण आढळले आहेत.
पुणेः राज्यात कोरोनाच्या नव्या विषाणूने डोकं वर काढल आहे. नागरिकांनी भीती न बाळगता काळजी घेण्याचे आवाहन सरकारने केले आहे. सिंधुदुर्ग मध्ये पहिला रुग्ण आढळून आला होता तर सद्यस्थिती राज्यात एकूण १० रुग्ण झाले आहे. सिंधुदुर्गपाठोपाठ कोरोनाचा उपप्रकार असलेल्या ओमिक्रॉनचा नवीन व्हेरिएंट असलेल्या जेएन १ चे पुणे शहरात दोन आणि पुणे ग्रामीणमध्ये १ असे तीन रुग्ण आढळले आहेत. तर राज्यात या रुग्णांची संख्या १० वर गेली असून त्या सर्व रुग्णांना कोरोनाची सौम्य लक्षणे होती व ते गृहविलगीकरणात बरे झाले असल्याची माहिती राज्याच्या साथरोग विभागाने दिली.
पुणे शहरातील रुग्ण हा अमेरिकेतून आला होता. याआधी सिंधुदुर्गमध्ये ४१ वर्षांच्या पुरुषाला या ‘जेएन-१’ नव्या विषाणूची बाधा झाली होती. त्याच्या जिनोम सिक्वेन्सिंगमधून हा प्रकार समोर आला. मात्र, आता त्यापाठोपाठ पुणे शहरात २, पुणे ग्रामीण १, ठाणे मनपात सर्वाधिक ५, अकोला आणि सिंधुदुर्गमध्ये प्रत्येकी १ असे एकूण १० रुग्ण झाले आहेत.
या दहा रुग्णांपैकी सिंधुदुर्ग येथील रुग्ण पुरुष वगळता उर्वरित ८ रुग्ण पुरुष तर एक महिला आहे. त्यापैकी एक ९ वर्षांचा मुलगा, २१ वर्षांची महिला, २८ वर्षांचा पुरुष व राहिलेले सर्व ४० वर्षांवरील आहेत. यापैकी ८ जणांनी कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेले आहेत, अशी माहिती राज्याच्या साथरोग विभागाने दिली आहे.
Web Title: Corona Virus JN 1 patient Found in Maharashtra
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App