Home संगमनेर संगमनेरात कसारा दुमाला येथे आढळला करोनाबाधित

संगमनेरात कसारा दुमाला येथे आढळला करोनाबाधित

Coronavirus/संगमनेर: अहमदनगर जिल्ह्यात आज सायंकाळी दहा पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त झाले आहेत. यात संगमनेर तालुक्यातील कसारा दुमाला येथे करोना बाधित आढळून आला आहे. त्यामुळे संगमनेर तालुक्यात करोनाबाधितांचा आकडा ११३ झाला आहे.

नगर शहरातील ०२, कोपरगाव ०३, पाथर्डी ०१,मुंगी शेवगाव ०१, नेवासा फाटा नेवासा ०१, श्रीरामपूर येथील ०१ हे करोनाबाधित सायंकाळी आढळून आले आहेत.

तसेच आज सकाळी २४ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले होते. आज १५० व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

आज सकाळी संगमनेरमध्ये सय्यदबाबा चौक व कुरण येथे प्रत्येकी एक रुग्ण आढळून आले होते. आज दिवसभरात संगमनेर तालुक्यात तीन रुग्ण आढळून आले आहेत.  

Website Title: Coronavirus Sangamner kasara dumala corona patient

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here