Home संगमनेर संगमनेर तालुक्यात शनिवारी १६ करोनाबाधित  

संगमनेर तालुक्यात शनिवारी १६ करोनाबाधित  

Coronavirus Sangamner taluka today 14 corona infected

Coronavirus/संगमनेर: संगमनेर तालुक्यात आज शनिवारी सकाळी सात पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त झाले होते त्यानंतर सायंकाळी पुन्हा सात करोना पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त झाले आहेत.रात्री दोन अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहेत. 

सकाळी प्राप्त झालेल्या अहवालात गुंजाळवाडी ३, कुरण ३ तर शिबलापूर येथील एकाचा समावेश आहे.

आज सायंकाळी प्राप्त झालेल्या अहवालानुसार शहरातील बाजारपेठ येथे ३४ वर्षीय महिला, सराफवाडा येथील २९ वर्षीय तरुण, नाईकवाडापुरा येथे ६५ वर्षीय पुरुष करोनाबाधित आढळून आले आहेत.

संगमनेर तालुक्यातील वाघापूर येथे ५२ वर्षीय पुरुष, शिबलापूर येथे २६ व ५० वर्षीय पुरुष आणि २१ वर्षीय तरुणी या सात जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. 

रात्री उशिरा प्राप्त अहवालात माळीवाडा येथील ३१ वर्षीय पुरुषाला तसेच वडगाव लांडगा येथील ४२ वर्षीय व्यक्तीला करोनाची लागण झाली आहे. शनिवारी दिवसभरात १६ पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त झाले आहेत.   संगमनेर तालुक्यात एकूण रुग्णसंख्या ३४८  झाली आहे. १४ जणांचा मृत्यू झालेला आहे. 

वाचकहो, ‘संगमनेर अकोले न्यूज’ ला व्हाटस अप वर फॉलो करताय ना?… अजून जॉईन केले नसेल तर क्लिक करा -(Sangamner Akole News) आणि मिळवा ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलवर.  

Website Title: Coronavirus Sangamner taluka today १६ corona infected

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here