Home संगमनेर संगमनेर: मुलींच्या चारित्र्याशी खेळणाऱ्यांना देहदंड आणि फाशी ही एकच शिक्षा : चित्रा...

संगमनेर: मुलींच्या चारित्र्याशी खेळणाऱ्यांना देहदंड आणि फाशी ही एकच शिक्षा : चित्रा वाघ

Breaking News | Sangamner: महिला-मुलींच्या चारित्र्याशी खेळणाऱ्यांना देहदंड आणि फाशी ही एकच शिक्षा असल्याचे भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी म्हटले.

Corporal punishment and hanging are the only punishments for those who play with the character of girls

संगमनेर: दीडशे वर्षे जुने कायदे मोडीत काढायचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने केले आहे. त्यामुळे या आरोपींना सोडणार नाही. महिला-मुलींच्या चारित्र्याशी खेळणाऱ्यांना देहदंड आणि फाशी ही एकच शिक्षा असल्याचे भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी म्हटले.

दहावीतील विद्यार्थिनीवर अत्याचाराची घटना घडली आहे. त्यानंतर या मुलीने आत्महत्या केली. या घटनेनंतर सामाजिक वातावरण गंभीर झाले. या पार्श्वभूमीवर बुधवार दि. २० मार्च रोजी भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी मयत मुलीच्या कुटुंबियांची भेट घेऊन दिलासा दिला. तसेच घडलेल्या घटनेची सर्व माहिती जाणून घेतली. प्रसार माध्यमांशी बोलताना चित्रा वाघ म्हणाल्या, येणाऱ्या दिवसांत या सगळ्या गोष्टी आपल्याला होताना दिसतील हे सगळं होत असताना कायदे, पोलीस, सरकार हे आपल्यासाठी आहे. त्यामुळे आपल्यालाही पुढाकार घ्यायला लागेल. आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टीची कल्पना मिळाली तरी आपण पोलिसांना सांगितले पाहिजे. ज्यामुळे गोरगरीबांच्या मुली, महिलांचे जीव वाचू शकतील. सदर घटना ही अत्यंत दुर्दैवी आहे. पोलीस त्यांचा तपास करत आहे. यामध्ये एक गोष्ट आवर्जून सांगावी लागेल ज्या वेळेला ही घटना घडली हा जो कोणी मुख्य आरोपी आहे याने या अगोदरही अशा पद्धतीने मुलींना त्रास दिला आहे. गावात जवळपास पंधरा ते वीस जणांचे टोळके आहे. शाळा सुटायच्या वेळेस ते मुलींना कुठे तरी भुलवून त्यांच्या मागे लागून अशा पद्धतीने मुलींसोबत वाईट प्रकार करायचे हे या टोळक्याचे काम आहे. यापूर्वीही अशा पद्धतीच्या घटना घडल्या आहेत. पोलीस त्यांचे काम करत असून यामध्ये एकालाही सोडले जाणार नाही, असेही चित्रा वाघ यांनी सांगितले.

Web Title: Corporal punishment and hanging are the only punishments for those who play with the character of girls

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here