Home Maharashtra News एसटी संपावर महामंडळाने घेतला मोठा निर्णय

एसटी संपावर महामंडळाने घेतला मोठा निर्णय

MSRTC Bus Strike
Kalyan ST Depot (PC – Sourabh Gosavi)

मुंबई : मागील अनेक महिन्यांपासून थंड पडलेली एसटीची सेवा पुन्हा सुरळीत सुरू राहावी म्हणून आता यांत्रिक कर्मचारी, वाहतूक निरीक्षक आणि वाहतूक नियंत्रकांचा वापर ‘चालक’ आणि ‘वाहक’ म्हणून करण्यात येणार असल्याची बाब समोर येऊ लागली असून एसटी महामंडळ (MSRTC) हा नवा निर्णय घेण्याचा तयारीत असल्याचे समजते.

विलीनीकरणाच्या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी ऐन दिवाळीत सुरू केलेला संप नवीन वर्षात अद्यापही सुरु असल्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत असून खाजगी वाहनांची चंगळ सुरू आहे. यामुळे यांत्रिक कर्मचारी व सहाय्यक वाहतूक निरीक्षकांना एसटी बसेसवर ‘चालक’ म्हणून तर वाहतूक नियंत्रकांचा ‘वाहक’ म्हणून वापर करून बसफेऱ्या वाढवण्याचे आता एसटी महामंडळाने ठरवले आहे.

एसटी कर्मचाऱ्यांचा संप अडीच महिन्यांपेक्षा अधिक काळापासून सुरू आहे. त्यामध्ये प्रामुख्याने चालक आणि वाहक मोठ्या संख्येने असल्यामुळे त्याचा फटका एसटी बसच्या वाहतुकीला बसला आहे. यावर तोडगा म्हणून नवा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे. लवकरच या कर्मचाऱ्याना त्यांच्या आगारात प्रशिक्षणही दिले जाणार आहे. एसटी महामंडळाच्या निर्णयानुसार संप कालावधीमध्ये पहिल्या टप्प्यात चालक पदाहुन ज्यांना वाहक परीक्षक व सहाय्यक वाहतूक निरीक्षक पदावर पदोन्नती दिली गेली, त्या कर्मचाऱ्यांना दोन दिवसांची प्रॅक्टिस देऊन त्यांचा प्रवासी वाहनांवर चालक म्हणून वापर केला जाणार आहे.

दुसर्‍या टप्प्यात अवजड वाहन चालविण्याचा परवाना असणाऱ्या यांत्रिकी कर्मचार्‍यांची अशा विभागीय पातळीवर माहिती गोळा करून त्यांच्याकडून विभागीय पातळीवर प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे तत्काळ आनलाईन अर्ज करून प्रवासी वाहन चालक अनुज्ञप्ती बिल्ला काढावयाचा आहे. यांत्रिक अथवा वाहतूक कर्मचाऱ्यांचा वापर संप काळात चालक म्हणून आणि वाहतूक नियंत्रक यांचा वापर संप काळात वाहक म्हणून केल्यास अशा कर्मचाऱ्यांना प्रती दिन ३०० रुपये एवढा प्रोत्साहन भत्ता देण्याची तरतूद करण्याची सूचना महामंडळाने सर्व विभाग नियंत्रकांना करण्याचे आदेशात नमूद केले आहेत.

Web Title : MSRTC takes big decision on ST strike

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here