Nitesh Rane : सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणूक रणधुमाळीत शिवसेना कार्यकर्ते संतोष परब यांच्यावर झालेल्या हल्ल्या प्रकरणी भाजप आमदार वादात अडकले आहेत. हल्ल्या प्रकरणी भाजप आमदार नितेश राणे यांच्या नियमित जामीन अर्जावर सिंधुदुर्ग कोर्टात सुनावणी होत आहे. कालच्या सुनावणीत दोन्ही बाजूंचा युक्तिवाद संपला असून कोर्ट आपला निर्णय आज दुपारी 3 वाजता सुनावणार आहे. यावेळी सरकारी वकील म्हणून प्रदीप घरत यांनी युक्तीवाद केला आहे. तर संतोष परब यांच्याकडून वकील विलास पाटील शिरगावकर आणि नितेश राणे यांच्यातर्फे वकील सतीश मानशिंदे यांनी युक्तिवाद केला.
नितेश राणे यांच्या जामिनाबाबत झालेल्या आजच्या सुनावणीत सरकारी वकील म्हणून प्रदीप घरत यांनी युक्तीवाद करताना म्हणाले, ‘सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आदेशानुसार नितेश राणे यांनी पहिल्यांदा जिल्हा सत्र न्यायालयाला शरण यावं आणि मग नियमित जामिनासाठी अर्ज करावा, ही अट त्यांच्याकडून पाळली गेली का? तसंच हा हल्ला सुपारी देऊन करण्यात आलेला आहे. कारण आरोपींमधील कोणीही संतोष परब यांना ओळखत नाही. त्यामुळे ते हल्ला का करतील? त्यामुळे या प्रकरणाच्या योग्य तपासासाठी काही दिवसांची पोलीस कस्टडी आवश्यक आहे.
दुसरीकडे संतोष परब यांचे वकील विलास पाटील शिरगावकर यांनीही पोलीस कस्टडीची मागणी केली, ते म्हणाले, ‘कोर्टाला शरण आलेल्या आरोपीला पोलीस कस्टडी व्हायला पाहिजे.’ नितेश राणे यांच्यातर्फे वकील सतीश मानशिंदे यांनी युक्तिवाद केला. दरम्यान या सर्व युक्तीवादानंतर कालचा निर्णय कोर्टाने राखून ठेवला असून आज दुपारी 3 वाजता कोर्ट याप्रकरणी आपला निर्णय सुनावणार आहे.
Web Title : Court to give verdict in Nitesh Rane case today