Nitesh Rane : भाजप आमदार नितेश राणे यांच्यासाठी आजचा कोर्टाचा निकाल धक्कादायक असा आला आहे. सिंधुदुर्ग सत्र न्यायालयाने नितेश राणे यांचा जामीन अर्ज फेटाळला असल्याचे समोर आले आहे. काल नितेश राणे यांच्या जामीन अर्जावर न्यायालयात सुनावणी झाली होती. मात्र आज, सत्र न्यायालयाने आपला निकाल दिला. कोर्टाकडून जामीन अर्ज फेटाळण्यात आल्याने नितेश राणे यांना आता अटक होण्याची शक्यता आहे. दरम्यान, सत्र न्यायालयाने दिलेल्या निर्णयाविरोधात नितेश राणे जिल्हा न्यायालयात धाव घेणार आहेत.
नितेश राणेंच्या अटकपूर्व जामीन अर्जावर कालच सुनावणी पार पडली होती. त्यानंतर आज सकाळी नितेश राणे यांचे स्वीय सहाय्यक राकेश परब यांना 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. ही पोलीस कोठडी 4 फेब्रुवारी पर्यंत असणार आहे.
सुप्रीम कोर्टाकडून अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्याच्यानंतर नितेश राणे सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयात हजर झाले होते. सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांचे प्रचारप्रमुख असलेले संतोष परब यांच्यावर झालेल्या हल्ला प्रकरणात नितेश राणे यांचा अटकूपर्व जामीन अर्ज गुरुवारी सुप्रीम कोर्टाने फेटाळला होता. यावेळी सुप्रीम कोर्टाकडून नितेश राणे यांना जिल्हा न्यायालयात शरण जाण्यास तसंच नियमितरित्या जामिनासाठी अर्ज करण्याचे निर्देश दिले होते. यासाठी कोर्टाकडून नितेश राणे यांना 10 दिवसांची मुदत देखील दिली होती. मात्र आता इथेही अर्ज फेटाळल्याने राणे यांच्यावर अटकेची टांगती तलवार फिरत आहे.
Web Title : Court verdict shocks Nitesh Rane