Home Crime News तरुणीच्या गुप्तांगातून केली कोरोना चाचणी; विकृताला दहा वर्षांची शिक्षा

तरुणीच्या गुप्तांगातून केली कोरोना चाचणी; विकृताला दहा वर्षांची शिक्षा

Amravati News

Amravati Crime : कोरोनाच्या चाचणीसाठी अमरावतीमध्ये तरुणीच्या गुप्तांगातून स्वॅब घेण्यात आल्याची आश्चर्यजनक घटना २०२० मध्ये घडली होती. अमरावतीमधील मोदी ट्रॉमा केअर सेंटरमधील ही संतापजनक घटना आहे. टेक्निशियन असणाऱ्या आरोपी अलकेशने तरुणीच्या घशातील स्वॅबचे नमुने घेतले. यानंतर त्याने तिच्या गुप्तांगातूनही स्वॅबचे नमुने घेतल्याचा आरोप त्याच्यावर झाला होता. यानंतर तरुणीने केलेल्या तक्रारीच्या आधारावर गुन्हा दाखल करून पोलिसांनी त्याला अटक केली होती.

आता याप्रकरणी कोर्टानेही मोठा निकाल दिला आहे. आरोपी अलकेशविरोधातील गुन्हा सिद्ध झाल्यानंतर कोर्टाने त्याला दहा वर्षाच्या सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली आहे. आरोपी अलकेशविरोधात बडनेरा पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला होता.

ऑफिसमधील एका सहकाऱ्याला करोनाची लागण झाल्याने व त्याच्या संपर्कात आल्यामुळे २८ जुलै २०२० रोजी संबंधित तरुणी करोना चाचणीसाठी गेली होती. तिच्यासोबत इतरांचीही करोना चाचणी करण्यात आली होती. रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचे सांगत तिला परत बोलावण्यात आलं. सदर आरोपीने या तरुणीला युरिनल चाचणी करावी लागेल असं सांगितलं. यावेळी सदर तरुणीसोबत तिची महिला सहकारीदेखील होती. त्यांनी महिला कर्मचाऱ्या बाबत विचारणा केली असता आरोपीने कोणीही नसल्याचे सांगितले. यानंतर आरोपीने तिच्या गुप्तांगातून स्वॅब घेत कोरोनाचा रिपोर्ट निगेटिव्ह असल्याचं सांगितलं.

कोरोना चाचणीसाठी गुप्तांगातून नमुने घेतल्याबाबत शंका आल्याने तरुणीने सर्व प्रकार आपल्या भावाला सांगितलं. यानंतर त्यांनी शाहनिशा करण्यासाठी इतर डॉक्टरांकडे चौकशी केली असता अशा पद्धतीने नमुने घेत नसल्याचं त्यांना सांगितलं. नंतर त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेत सदर विकृत टेक्निशियन विरोधात तक्रार केली. पोलिसांनी तपासानंतर अलकेशला बेड्या ठोकल्या असून आता कोर्टाने त्याला दहा वर्षांसाठी तुरुंगवास ठोठावला आहे.

Web Title : Covid test performed on a young woman’s genitals in Amravati; Ten years imprisonment for perversion

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here