Home Crime News शिवीगाळ केल्यामुळं २० वर्षीय नातेवाईकाची गोळ्या झाडून हत्या

शिवीगाळ केल्यामुळं २० वर्षीय नातेवाईकाची गोळ्या झाडून हत्या

Maval Crime

मावळ : (Maval) तालुक्यातील रोहन चंद्रकांत येवले या वीस वर्षीय तरुणाची आज सकाळी दहाच्या दरम्यान गोळ्या झाडून निर्घृणपणे हत्या करण्यात आली. अविनाश शिवाजी भोईर असे २५ वर्षीय खुन्याचे नाव आहे. हे दोघेही एकमेकांचे नातेवाईक असून आढले खुर्द या गावातील राहणारे आहेत. मागील दोन दिवसांपूर्वी झालेल्या वादातूनच रोहनचा खून झाल्याचा संशय पिंपरी-चिंचवड पोलिसांना व्यक्त केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहन आणि अविनाश हे दोघे एकमेकांचे नातेवाईक आहेत. त्यांच्यात दोन दिवसांपूर्वी वादावादी होत शिवीगाळ झाली होती. याच रागातून आज सकाळी आरोपी अविनाशने रोहनला घराबाहेर बोलावले. त्यांच्यात पुन्हा वाद होऊन झटापट झाली. शिवीगाळ केल्याच्या रागातून अविनाशने पिस्तूल काढून रोहनच्या दिशेने गोळ्या झाडल्या. त्यापैकी एक गोळी रोहनच्या छातीच्या वर तर दुसरी गोळी दंडाला स्पर्श करून गेली. गोळ्या झाडून घटनास्थळावरून अविनाशने पळ काढला असल्याची माहिती शिरगावचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सत्यवान माने यांनी दिली आहे.

रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या रोहनला तात्काळ खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलें. मात्र उपचारादरम्यान रोहनचा मृत्यू झाला आहे. आरोपी अविनाश देखील जखमी झाला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. उपचार होताच आरोपी अविनाशला ताब्यात घेणार असल्याचे पोलीस निरीक्षक माने यांनी सांगितले आहे.

Web Title : A relative was shot dead in Maval taluka for abusing him

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here