अहमदनगर: महिलेवर अत्याचार प्रकरणी पोलिस उपनिरीक्षकावर गुन्हा
Breaking News | Ahmednagar: एका महिलेवर गेल्या पाच वर्षांपासून अत्याचार केल्याप्रकरणी जळगाव पोलिस दलात कार्यरत असलेला उपनिरीक्षक याच्यासह पाच जणांवर १ ऑगस्ट रोजी कर्जत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल.
कर्जत: लग्नाचे आमिष दाखवत कर्जत तालुक्यातील एका महिलेवर गेल्या पाच वर्षांपासून अत्याचार केल्याप्रकरणी जळगाव पोलिस दलात कार्यरत असलेला उपनिरीक्षक याच्यासह पाच जणांवर १ ऑगस्ट रोजी कर्जत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडित महिलेच्या फिर्यादीवरून पोलिस उपनिरीक्षक पाराजी कोंडीराम वाघमोडे, अमृत कोंडीराम वाघमोडे, शंकर कोंडीराम वाघमोडे (सर्व रा. माका, ता. नेवासा) व इतर दोन महिलांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिस निरीक्षक मारुती मुलुक पुढील तपास करीत आहेत.
पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव पोलिस दलात उपनिरीक्षक पदावर कार्यरत असणाऱ्या पाराजी कोंडीराम वाघमोडे याने कर्जत तालुक्यातील महिलेला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर सन २०१९ ते ३१ ऑगस्ट २०२४ पर्यंत नाशिक शहर, मनमाड चौफुली, मालेगाव येथील हॉटेल तसेच शिर्डी येथील लॉजवर नेऊन तिच्यावर अत्याचार केला. तसेच आरोपीने स्वतःच्या मोबाइलमध्ये व्हिडीओ रेकॉर्डिंग केले. पीडितेने लग्नाबाबत आरोपीकडे तगादा लावला असता, त्याने लग्न करण्यास टाळाटाळ केली. दरम्यान, पीडितने आरोपीकडे दि. ३१ ऑगस्ट रोजी लग्नाबाबत विचारणा केली असता, पाराजी वाघमोडे याने तिला पांढरी पूल (ता. नेवासा) येथे नेत नेते व तेथे अमृत कोंडीराम वाघमोडे, शंकर कोंडीराम वाघमोडे व इतर दोन महिलेस बोलावून घेत पीडितेचा मोबाइल काढून घेत तिला जबरदस्तीने गाडीत बसविले तसेच तिला चार जणांनी पुन्हा मारहाण केली. त्यानंतर पीडितेस कर्जत तालुक्यातील तिच्या आई- वडिलांच्या घरी आणून अश्लील शिवीगाळ करत पुन्हा मारहाण केली, असे फिर्यादीत नमूद आहे.
Web Title: Crime against police sub-inspector in case of assault on woman
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study