Home संगमनेर संगमनेर: आक्षेपार्ह वक्तव्यावरून रामगिरी महाराजांवर गुन्हा

संगमनेर: आक्षेपार्ह वक्तव्यावरून रामगिरी महाराजांवर गुन्हा

Breaking News | Sangamner: कथित आक्षेपार्ह वक्तव्यावरून त्यांच्याविरोधात संगमनेर पोलिसांत गुन्हा दाखल झाला.

Crime against Ramgiri Maharaj for offensive statement

संगमनेर/नाशिक : पंचाळे (ता. सिन्नर, जि. नाशिक) येथे सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहात सरला बेटाचे मठाधिपती रामगिरी महाराज यांनी केलेल्या कथित आक्षेपार्ह वक्तव्यावरून त्यांच्याविरोधात संगमनेर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, या आक्षेपार्ह वक्तव्याच्या निषेधार्थ अहमदनगर- छत्रपती संभाजीनगर महामार्गावर रास्ता रोको केला. संबंधित मठाधिपतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी यावेळी मुस्लिम समाजाने केली होती.

दूध विक्रेते अहमद रझा युनूस शेख (वय २३, रा. लखमीपुरा, संगमनेर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी

गुन्हा नोंदवून घेतला. शेख हे मोबाइल पाहत असताना एका व्हॉटस्अॅप समूहात रामगिरी महाराज यांनी हे वक्तव्य केल्याचा व्हिडीओ पाहिला. त्याद्वारे मुस्लिम धर्मीयांच्या भावना दुखावल्या आहेत, असे फिर्यादीत म्हटले आहे. भारतीय न्याय संहिता कलम ३०२, ३५३ (२) नुसार पोलिसांनी गुन्हा नोंदवून घेतला.

विधानाचा विपर्यास

प्रवचनात मी विविध दाखले दिले. त्याची मोडतोड करीत छोट्या क्लिप बनवून त्या सोशल मीडियावर प्रसारीत करण्यात करुन विधानाचा विपर्यास केला, असे रामगिरी महाराज म्हणाले.

Web Title: Crime against Ramgiri Maharaj for offensive statement

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here