संगमनेरच्या सात जणांवर गुन्हा, चारित्र्यावर संशय, 10 लाखांची मागणी
Breaking News | Ahmednagar Crime: चारित्र्यावर संशय घेऊन व पुणे येथे नवीन फ्लॅट घेण्यासाठी १० लाख आणण्यासाठी विवाहितेचा सासरच्यांनी छळ केल्याची घटना समोर.
संगमनेर: चारित्र्यावर संशय घेऊन व पुणे येथे नवीन फ्लॅट घेण्यासाठी १० लाख आणण्यासाठी विवाहितेचा सासरच्यांनी छळ केल्याची घटना समोर आली आहे. नगर शहरात राहणाऱ्या पीडित विवाहितेने याप्रकरणी मंगळवारी (दि. २६) दुपारी दिलेल्या फिर्यादीवरून सात जणांविरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पती सागर शिवनाथ काळे (रा. लक्ष्मी चौक, हिंजवडी, पुणे), सासरे शिवनाथ कुंडलिक काळे, सासु अनुसया शिवनाथ काळे, दीर सतीष शिवनाथ काळे (सर्व रा. बागवान मळा, समनापुर ता. संगमनेर), मध्यस्थी प्रभाकर कुंडलिक काळे (रा. श्रीरामपुर), सुप्रिया आण्णा वाळके, आण्णा वाळके (पूर्ण नावे माहिती नाही, रा. कासारवाडी ता. संगमनेर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. सदरची घटना सप्टेंबर २०१९ ते १७ डिसेंबर २०२३ दरम्यान घडली आहे. फिर्यादीचा विवाह सागर काळे याच्याशी झाला आहे. विवाहनंतर फिर्यादी सासरी समनापुर व हिंजवडी, पुणे येथे नांदत असताना सासरच्यांनी त्यांच्या चारित्र्यावर संशय घेऊन शिवीगाळ व मारहाण केली. सासरच्या लोकांनी पती सागर याला पुणे येथे नवीन फ्लॅट घेण्यासाठी १० लाख रूपये आणण्यासाठी शिवीगाळ करून छळ केला. आमच्या नादी लागले तर तुम्हाला जिवे मारून
टाकू अशी धमकी दिली. शारिरीक व मानसिक त्रास देऊन उपाशीपोटी ठेऊन अपमानास्पद व क्रुरतेची वागणूक देऊन घराबाहेर काढून दिले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. दरम्यान पीडितेने यासंदर्भात मंगळवारी, २६ मार्च रोजी तोफखाना पोलिसात फिर्याद दिली. पोलिसांनी फिर्यादीच्या पतीसह सात जणांवर गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस अंमलदार एम. बी. गरड करत आहेत.
Web Title: Crime against seven people, suspicion of character, demand of 10 lakhs
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study