Home अहिल्यानगर दंड मागितला तर दोघांनी पोलिसांनाच केली मारहाण

दंड मागितला तर दोघांनी पोलिसांनाच केली मारहाण

Crime asked for a fine the two beat up the police

अहमदनगर | Crime: कोरोना पार्श्वभूमीवर जिल्ह्यात अनेक निर्बंध लागू आहेत. निर्बंध मोडल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येते. दुचाकीहून डबलसीट जात असलेल्यानी नियमांचे उल्लंघन केल्याने पोलिसांनी दंड मागितला असता त्याचाच राग आल्याने पोलीस कर्मचाऱ्याला शिवीगाळ व मारहाण केली.

हा प्रकार एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. मारहाण करणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.

अनिल पांडुरंग आव्हाड असे मारहाण झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. दादाभाऊ फ्र्नासीस वंजारे व कैलास साळवे रा. वडगाव गुप्त असे या आरोपींचे नांवे आहे. न्यायालयाने आरोपींना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.

आव्हाड यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार कोव्हीड प्रदुर्भावाच्या अनुषंगाने बोल्हेगाव येथे जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांविरोधात कारवाई करत होते. त्यावेळी हे दोन आरोपी दुचाकीवरून डबलसीत आले असता त्यांना आव्हाड यांनी दंड भरण्यास सांगितला. जिल्ह्यात दुचाकीवरून डबलसीट फिरण्यास मनाई आहे. दंड भरण्यास सांगितल्याने आव्हाड यांना आरोपी यांनी शिवीगाळ व मारहाण केली.  

Web Title: Crime asked for a fine the two beat up the police

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here