Home Ahmednagar Live News मोहटादेवीच्या दर्शनासाठी आलेल्या भविकांना येथील नारळ विक्रेत्यांनी केली मारहाण

मोहटादेवीच्या दर्शनासाठी आलेल्या भविकांना येथील नारळ विक्रेत्यांनी केली मारहाण

Crime devotees who came to pay homage to Mohatadevi were beaten

पाथर्डी | Pathardi Crime:  मोहटादेवीच्या दर्शनासाठी आलेल्या भविकांना येथील नारळ विक्रेत्यांनी किरकोळ कारणावरून जबर मारहाण केल्याची घटना घडली आहे. ही घटना शुक्रवारी रात्री घडली. या घटनेत तिघे जण  जखमी झाले आहेत.

या प्रकरणी पाथर्डी पोलिसांनी पांडुरंग दहिफळे यांच्यासह दोघाजणांवर गुन्हा दाखल केला आहे. शुक्रवारी रात्री गणेश कांताराम कातार (रा.बोरगाव बाजार ता. सिल्लोड) हे नातेवाईकांसह मोहटा देवीच्या दर्शनासाठी आले होते. त्यांनी देवीगडावर असलेले नारळ विक्रेते पांडुरंग दहिफळे यांच्याकडून नारळ विकत घेतले. दहिफळे यांनी दिलेले काही नारळ कातार यांनी बदलून मागितल्याचा राग येऊन दहीफळ व त्यांच्या सोबत असलेल्या एका महिलेने व पुरुषाने कातार व त्यांच्या नातेवाईकांना लाकडी काठीने मारहाण केली.

या मारहाणीत कातार यांच्यासह पूजा गणेश कातार व वैजिनाथ कातार हे जखमी झाले. गणेश कातार यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी तपास पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नायक निलेश म्हस्के हे करत आहेत.

Web Title: Crime devotees who came to pay homage to Mohatadevi were beaten

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here