संगमनेर: जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत, शिवसेना खासदाराची मागणी
अहमदनगर Crime Demand: राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आज संगमनेर तालुक्यात निळवंडे कालव्याची पाहणी केली. यावेळी त्यांच्यामसवेत महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे उपस्थित होते. यावेळी लोकसभा मतदार संघाचे खा. सदाशिव लोखंडे यांना मात्र निमंत्रित केले नव्हते.
कदाचित याचाच राग आला असल्याने मंत्री जाताच लोखंडे जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे लेखी तक्रार करण्यात आली आहे, मंत्र्यांना जबाबदार न धरता त्यांनी जलसंपदा विभाग स्थानिक अधिकारी विरोधात तक्रार करून जमावबंदी भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
खा. लोखंडे यांनी पत्रात म्हंटले आहे की, कोरोना वाढला आहे म्हणून लॉकडाऊन जाहीर केला आहे. जिल्हाधिकार्यांनी जमावबंदीचे आदेशही दिले आहेत.
आज जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता अरुण नाईक व कार्यकारी अभियंता गिरीष शिंघानी यांनी आढळा नदीवरील जलसेतूचा पाहणी दौरा आयोजित केला. यावेळी राज्यातील तीन मंत्री व ६० ते ७० नागरिक उपस्थित होते. त्यामुळे जमावबंदी आदेशाचा भंग झाला असल्याने या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी लोखंडे यांनी केली आहे.
Web Title: Crime filed Demand against the officials of water resources department