Home अहमदनगर रील बनविण्यासाठी  साईमंदिरावर ड्रोन उडविणे तरुणाला चांगलेच महागात पडले

रील बनविण्यासाठी  साईमंदिरावर ड्रोन उडविणे तरुणाला चांगलेच महागात पडले

Ahmednagar News: ड्रोन उडवण्यास बंदी असताना रील बनविण्यासाठी ड्रोन उडविणाऱ्या तरुणावर गुन्हा व्हीडीओ व्हायरल झाल्यानंतर गुन्हा दाखल.

Crime filed young man who flew a drone to make a reel after the video went viral

शिर्डी | Shirdi : येथील साईबाबांच्या समाधी मंदिर परिसरात ड्रोन उडवण्यास बंदी असताना रील बनविण्यासाठी ड्रोन उडविणाऱ्या तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रीलसाठी ड्रोन उडविणे या तरुणाला चांगलेच महागात पडले आहे. देव दोडीया असे मुंबई येथील या तरुणाचे नाव आहे. राज्यातील सर्वाधिक श्रीमंत म्हणून ओळख असलेल्या शिर्डीच्या साईबाबा मंदिरात रोज हजारो भाविक देशभरातून दर्शनासाठी येतात. त्यामुळे भाविकांच्या सुरक्षेसाठी विविध उपाय योजना संस्थान आणि पोलीस प्रशासनाकडून राबविल्या जातात.  या उपाययोजनेतील भाग म्हणून साई मंदिर आणि परिसरात ड्रोन उडवण्यास बंदी घालण्यात आली आहे; मात्र मुंबई येथील इसमाने रील बनविण्यासाठी साई मंदिर परिसरात ड्रोन उडवल्याचा प्रकार समोर येताच त्याच्यावर शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात मुंबई येथील या तरूणाने ड्रोन उडवला होता. इंस्टाग्रामवर व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर हा सगळा प्रकार समोर आला व गुन्हा दाखल करण्यात आला.

मुंबईतील देव दोडीया या तरूणाने रील बनवण्यासाठी ड्रोनचा वापर केल्याने त्याच्यावर शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साई मंदिराशेजारी असलेल्या हॉटेलच्या टेरेसवरून ड्रोन उडवत या तरूणाने बनवलेले रील्स इन्स्टाग्रामवर टाकल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. काही दिवसांपूर्वी औरंगाबाद उच्च न्यायालयाने साईबाबा संस्थानला सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्याचे निर्देश दिले होते. त्या अनुषंगाने शिर्डी ग्रामस्थांना दर्शनासाठी ओळखपत्र अनिवार्य करण्यात आलं. त्यातच आता साई मंदिर परिसरात ड्रोन उडवण्याची घटना समोर आल्याने सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

Web Title:  Crime filed young man who flew a drone to make a reel after the video went viral

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here