Home अहमदनगर पोलीस वर्तुळात खळबळ; लाचेची मागणी, पोलीस हवालदारावर गुन्हा दाखल

पोलीस वर्तुळात खळबळ; लाचेची मागणी, पोलीस हवालदारावर गुन्हा दाखल

Ahmednagar News:  विनयभंगाच्या गुन्ह्यात तपासात मदत करण्यासाठी तसेच तडीपार व एमपीडीए अन्वये कारवाई न करण्यासाठी पोलीस निरीक्षकासाठी एक ते दीड लाख रुपये लाचेची (Bribe) मागणी केल्या प्रकरणी शिर्डीतील पोलिस हवालदारावर गुन्हा.

Crime has been filed against a police constable in Shirdi for demanding a bribe

शिर्डी: विनयभंगाच्या गुन्ह्यात तपासात मदत करण्यासाठी तसेच तडीपार व एमपीडीए अन्वये कारवाई न करण्यासाठी पोलीस निरीक्षकासाठी एक ते दीड लाख रुपये लाचेची मागणी केल्या प्रकरणी शिर्डीतील पोलिस हवालदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने पोलीस वर्तुळात खळबळ उडाली आहे.

विनयभंगाच्या गुन्ह्याचे तपासात मदत करण्यासाठी तसेच तडीपार व एमपीडीए अन्वये कारवाई न करण्यासाठी पोलीस निरीक्षकासाठी एक ते दीड लाख रुपये लाचेची मागणी करून तडजोडी अंती 30 हजार रुपये स्वीकारण्याची तयारी दाखविली व त्यानंतर दि 26 जुलै रोजी आरोपी पोलीस हवालदार संदीप गडाख यांनी शिर्डी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांच्यासाठी एक लाख रुपयांच्या लाचेची मागणी करून स्वीकारण्याची तयारी दर्शवली होती. म्हणून शिर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार संदीप गडाख (वय 40) याचे विरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 चे कलम 7 अ प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक परिक्षेत्राच्या पोलीस अधीक्षक श्रीमती शर्मिष्ठा घारगे वालावलकर तसेच लातूरचा प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक माधव रेड्डी पोलीस उपाधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. या कारवाईमध्ये नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस उपाधीक्षक वैशाली पाटील, पोलीस नाईक शरद हेंबाडे, पोलीस नाईक राजेंद्र गीते, चालक पोलीस नाईक परशुराम जाधव यांचा समावेश होता. या घटनेने मात्र पोलीस वर्तुळात खळबळ उडाली आहे.

Web Title: Crime has been filed against a police constable in Shirdi for demanding a bribe

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here