Home अहमदनगर संगमनेर: बस अपघात प्रकरणी चालकावर गुन्हा दाखल

संगमनेर: बस अपघात प्रकरणी चालकावर गुन्हा दाखल

Sangamner Crime News: संगमनेरकडे निघालेली एसटी बस पिंपरणेनजीक उलटल्याची घटना.

Crime  has been registered against the driver in the bus accident case

संगमनेर: कोळवाडी (ता. राहुरी) येथून संगमनेरकडे निघालेली एसटी बस पिंपरणेनजीक उलटल्याची घटना मंगळवारी (ता. २६) सकाळी घडली होती. याप्रकरणी जखमी विद्यार्थिनीने संगमनेर तालुका पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरून बस चालकावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल झाला आहे.

याप्रकरणी जखमी विद्यार्थिनी श्रृतिका अमोल खरात (वय १८, रा. मालुंजे) हिने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे, की सदर बसचालकाने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करुन भरधाव वेगाने चालवल्याने पिंपरणेनजीक रस्त्याच्याकडेला उलटली. यावरुन पोलिसांनी अज्ञात बसचालकावर गुरनं. ७५६/२०२३ भादंवि कलम २७९, ३३७, मोटार वाहन कायदा १८४ नुसार गुन्हा

दाखल केला आहे. दरम्यान, या बसमधून चालक व वाहकासह एकूण ५० प्रवाशी प्रवास करीत होते. अपघात घडल्यानंतर ग्रामस्थांनी तत्काळ बचावकार्य करीत बसमधील सर्व प्रवाशांना बाहेर काढले. तालुका पोलिसांना याबाबत माहिती मिळताच पोलीस निरीक्षक देवीदास ढुमणे यांच्यासह फौजफाटाही घटनास्थळी दाखल झाला होता.

या अपघातात २० विद्यार्थ्यांसह एक प्रवासी, चालक व वाहक असे एकूण २३ जण जखमी झाले आहेत. तर २७ जणांना मार लागला आहे. दरम्यान, गुन्हा दाखल झाल्याने बस आगारातील वाहनचालकानामध्ये एकच खळबळ उडाली आहे पुढील तपास पो. हेकॉ. डी. जे. दिघे करत आहेत.

Web Title: Crime  has been registered against the driver in the bus accident case

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here