Home संगमनेर संगमनेर: जमावाकडून मारहाण प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल

संगमनेर: जमावाकडून मारहाण प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल

Breaking News | Sangamner Crime: दुचाकीस कट का मारला? असे विचारले असता पिकअप चालकाला राग अनावर झाल्याने जमावाने तिघांना रॉडसह लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना कोल्हेवाडी रस्ता, जोर्वे नाका येथे पोलीस बंदोबस्त तैनात.

Crime has been registered against three people in the case of mob beating

संगमनेर: शहरातील कोल्हेवाडी रस्ता येथे दुचाकीस कट का मारला? असे विचारले असता पिकअप चालकाला राग अनावर झाल्याने जमावाने तिघांना रॉडसह लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना मंगळवार दि. १२ मार्चला सायंकाळी सव्वा सहा ते साडेसहा वाजेच्या सुमारास घडली होती. या घटनेमुळे शहरात तणावपूर्ण बातावरण बनले होते.

अखेर संगमनेर शहर पोलिसांनी तिघांवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. याबाबत शहर पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, राहुल सोपान गुंजाळ (वय ३८, रा. कोल्हेवाडी) हा तरुण कोल्हेवाडी येथून आपल्या दोन मुलींना दुचाकीवरून घेऊन नाटकी नाका संगमनेरकडे येत होता. त्यावेळी अल्फाज शेख याने विना क्रमांकाच्या पिकअप गाडीने गुंजाळ याच्या दुचाकीस कट मारून तू माझ्याकडे रागाने का पाहतो, असे म्हणून दुचाकीस पिकअप आडवी लावली आणि शिवीगाळ व मारहाण करण्यास सुरूवात केली. यानंतर अरबाज कुरेशी व समद कुरेशी व आणखी दोन ते तीन अनोळखी पाच जणांना फोन करून बोलावून घेत जमाव गोळा करून राहुल गुंजाळ, अमोल गुंजाळ व संदीप गुंजाळ यांना रॉडने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यातील अल्फाज शेख याने त्याच्या हातातील तलवारीने अमोल गुंजाळ यास जीवे मारण्याच्या उद्देशाने अंगावर उगारली असता त्यावेळी त्याने हुलकावणी हुलकावणी दिली. त्यानंतर शिवीगाळ व दमदाटी करून तो निघून गेला. दरम्यान या घटनेमुळे शहरात बातावरण तणावपूर्ण बनले होते. शहर पोलीस ठाण्याच्या आवारातही मोठी गर्दी झाली होती.

याप्रकरणी राहुल गुंजाळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलिसांनी वरील तिघांविरोधात गुरनं. २२६/२०२४ भादंवि कलम ३०७, ३४१, ३२४, ३२३, ५०४, ५०६, १४३, १४७, १४८, १४९, आर्म अॅक्ट ४, २५ नुसार गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान या घटनेमुळे शहरातील कोल्हेवाडी रस्ता, जोर्वे नाका या दोन्ही ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

Web Title: Crime has been registered against three people in the case of mob beating

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here