Home अहमदनगर घरासमोर उभे असताना पती पत्नीवर वार करत मारहाण

घरासमोर उभे असताना पती पत्नीवर वार करत मारहाण

Crime Husband assaults wife while standing in front of the house

राहुरी: राहुरी तालुक्यातील मानोरी येथे पती पत्नी आपल्या घरासमोर उभे असताना आरोपी अशोक गुलाब आढाव याने येऊन कोणत्या तरी हत्याराने वार करून त्यांना जखमी केल्याची घटना घडली आहे. दिनांक १७ जून रोजी रात्री ही घटना घडली.

देवराम मिखाईल आढाव रा. मानोरी ता. राहुरी यांनी राहुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून या फिर्यादीनुसार दिनांक १७ जून रोजी रात्री १०.३० वाजेच्या सुमारास देवराम आढाव व त्याची पत्नी सुमन, सून दिपाली, नात अक्षदा घरासमोर उभे असताना तिथे अशोक गुलाब आढाव रा. मानोरी हा दारू पिऊन तेथे आला व देवराम व त्याची पत्नी सुमन यांना शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यावेळी कोणत्या तरी हत्याराने देवराम आढाव यांच्या पोटावर व पत्नी सुमन यांच्या कंबरेवर वार करून जखमी केले. आणि परत माझ्या नादी लागला तर तुझा काटा काढीन अशी दमदाटी करून तेथून निघून गेला. देवराम आढाव यांनी तात्काळ राहुरी पोलिसांत धाव घेत फिर्याद दिली. या फिर्यादीवरून आरोपी अशोक गुलाब आढाव यांच्यावर मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक नंदकिशोर दुधाळ यांच्या मार्गदर्शनाखाली कॉन्स्टेबल डावखर हे करीत आहे.

Web Title: Crime Husband assaults wife while standing in front of the house

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here