Home क्राईम संगमनेर: मोबाईल नंबर ब्लॉक का केला, विवाहित महिलेवर कोयत्याने वार

संगमनेर: मोबाईल नंबर ब्लॉक का केला, विवाहित महिलेवर कोयत्याने वार

Sangamner Crime:  शस्त्राचा वापर करीत एका महिलेला जखमी केल्याची घटना.

Crime mobile number blocked, a married woman was stabbed with a knife

संगमनेर: मोबाईल नंबर ब्लॉक का केला याचा राग येत आरोपीने थेट फिर्यादीला कोयत्यानेच मारहाण केली. दसऱ्याच्या दिवशी संगमनेरात शस्त्राचा वापर करीत एका महिलेला जखमी केल्याची घटना घडली आहे. संगमनेर शहर पोलिसांनी राजेश जंबूकर व वैभव दांदे (रा. ढोलेवाडी, संगमनेर) या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, विजयादशमीच्या दिवशी शस्त्र चालवण्याचा पराक्रम आरोपींनी केला आहे. यामध्ये विलास काळे हा मित्र फिर्यादीच्या घरी असताना दोन्हीही आरोपी राजेश जंबूकर आणि वैभव दांदे हे फिर्यादीच्या घरी आले व सदर फिर्यादीस ‘तू माझा मोबाईल नंबर ब्लॉक का केला’ असा जाब विचारत कोयत्याने फिर्यादीच्या दोन्ही हाताच्या बोटावर व डोक्यावर वार करून गंभीर जखमी केले. यामध्ये फिर्यादीचे हाताचे बोट फॅक्चर झाले आहे. तसेच आरोपी वैभव दांदे यांनी हातातील लाकडी दांडा फिर्यादीचा मित्र विलास काळे याच्या पायावर गुडघ्यावर मारला व दोघांस लाथा बुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ करीत जीवे मारण्याची धमकी दिली. या आशयाच्या फिर्यादीवरून संगमनेर शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे. सदर घटना मालपाणी हेल्थ क्लब जवळ काशी आई मंदिराच्या पाठीमागे विजयादशमीच्या रात्री घडली आहे. याबाबत फिर्यादी महिलेने फिर्याद दिली असून अधिक तपास पोलीस हवालदार धनवट हे करत आहेत.

Web Title: Crime mobile number blocked, a married woman was stabbed with a knife

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here