Home Akole News अकोले घटना: ट्रॅक्टर अंगावर घालून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न

अकोले घटना: ट्रॅक्टर अंगावर घालून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न

Crime News Attempt to kill by putting a tractor on the body

अकोले | Crime News: ट्रॅक्टर शेतातून बाहेर काढण्यास सांगितल्याच्या रागातून एकनाथ वाकचौरे यांनी जातीवाचक शिवीगाळ व धक्काबुक्की केली. तसेच महेश वाकचौरे याने शेतात चालू असलेला ट्रॅक्टर अंगावर घालून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी हर्ष प्रशांत पवार वय २१ यांनी अकोले पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या फिर्यादीवरून एकनाथ वाकचौरे, महेश वाकचौरे, सोनाली पथवे, बाळू पथवे, मंदा पथवे, रामदास पथवे सर्व रा. कुंभेफळ यांच्याविरोधात Atrocity चा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

१९ ऑक्टोबर दुपारी साडे बारा वाजेच्या सुमारास कुंभेफळ शिवारात ही घटना घडली. हर्ष पवार यांनी फिर्यादीत म्हंटले आहे की, वरील आरोपी हे सर्व ट्रॅक्टर घेऊन फिर्यादीच्या शेतात ट्रॅक्टर घालून मशागत करत असल्याने फिर्यादीने शेतात जाऊन ट्रॅक्टर बाहेर काढा असे बोलल्याचा राग येऊन जातीवाचक शिवीगाळ करीत धक्काबुक्की केली. तसेच महेश वाकचौरे याने फिर्यादीच्या अंगावर ट्रॅक्टर घालून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. फिर्यादीची आई ही सोडवण्यासाठी मध्ये आली असता तिलाही मारहाण करण्यात आली असे फिर्यादीत म्हंटले आहे.

Web Title: Crime News Attempt to kill by putting a tractor on the body

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here